*चोपडा महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा*



*चोपडा महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा*

चोपडा दि.१५(प्रतिनिधी):   कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथील वाणिज्य व व्यवस्थापन  विभागातर्फे  जागतिक ग्राहक दिन निमित्त पोस्टर प्रेझेंटेशन चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.निर्मल देशमुख सर हे उपस्थित होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी सर तर या कार्यक्रमाला विभागाचे उपप्राचार्य एन.एस. कोल्हे सर,माजी उपप्राचार्य एम.बी.हांडे सर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे एडवोकेट निर्मल देशमुख यांनी ग्राहक संरक्षण कायद्या संदर्भात समाजात जागरूकता व त्याबद्दलची माहिती देताना ग्राहक संरक्षण कायद्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ग्राहकांनी आपल्या कोणकोणत्या अधिकारांचे बाबत जागरूक राहिले पाहिजे व ऑनलाईन पद्धतीने वस्तू विकत घेताना तसेच बाजारपेठेमध्ये वस्तू विकत घेत असताना किंवा वेगवेगळ्या सेवा घेत असताना कोणत्या गोष्टीं संदर्भात जागरूक राहिले पाहिजे तसेच एखाद्या ठिकाणी अडचण निर्माण झाल्यास त्या विक्रेत्याबद्दल त्याविरोधात कोणत्या ठिकाणी दाद  मागावी व त्याची प्रक्रिया कशा प्रकारची  असते त्या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच ग्राहक संरक्षण कायद्यातील नवीन अमेंडमेंत्स व कायद्यातील बदल याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागाचे  विभागप्रमुख डॉ. सी.आर.देवरे यांनी करत असताना सदर कार्यक्रमाची रूपरेषा व सदर कार्यक्रमाचा उद्देश यामध्ये विद्यार्थ्यांना प्रति ग्राहक संरक्षण कायद्याबद्दल जागरुकता निर्माण होणे यासंदर्भात प्रास्तविकात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलत असताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन एस कोल्हे यांनी सांगितले की जागतिक ग्राहक दिन यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी सर्व रुपी माहितीचे ज्ञान करून घेणे गरजेचे आहे आहे तसेच विद्यार्थ्यांसमोर असलेल्या विविध अडचणी आणि ग्राहकांसमोर असलेल्या विविध अडचणी या संदर्भात ग्राहकांनी कोणत्या ठिकाणी दाद मागावी याचे विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारचे पोस्टर प्रेझेंटेशन केले आहे .सदर कार्यक्रमात जवळ जवळ 350  विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रमात पोस्टर्स निरीक्षकांनी निरीक्षण केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यक्रमादरम्यान प्रथम उत्तम पोस्टर सदरीकरन  केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.या कार्यक्रमाचे आभार प्रा. अभिजित साळुंखे सर व सूत्रसंचालन  सौ आर.पी. जैस्वाल मॅडम यांनी केले . सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.व्ही. पी हौसे, प्रा. संदीप पाटील,प्रा. गोपाल पाटील व इतर सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील सौ.एच.ए. सूर्यवंशी, सौ पी एस जैन मिस पी पी कासार,मिस्टर के एन सोनार मिस्टर जी आय पिंगळे मिस्टर सी पी बाविस्कर मिस्टर जी जे  पटेल यांनी श्रम घेतले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने