लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त नांदूर पठार येथे बैलगाडा शर्यत*
जुन्नर पुणे दि.१५(प्रतिनिधी सावळाराम आहेर)
नांदूर पठार मध्ये तीन कोटी 78 लाख रुपयांचे भूमिपूजन आमदार निलेश लंके साहेब यांच्या हस्ते पार पडले त्याच दिवशी दिवसभर आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसनिमित्त बैलगाडा शर्यती च आयोजन करण्यात आले होते शर्यती ला चांगला प्रतिसाद मिळाला संध्याकाळी उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला .
आयोजक रविंद्र शेठ रजदेव् माजी सरपंच संदीप चौधरी ,सुरेश आग्रे ,विलास घोलप ,दत्ता चौधरी ,नारायण आग्रे शशिकांत आग्रे ,हारी देशमाने ,सुनील राजदेव ,दत्ता शेठ आहेर सदस्य ग्रामपंचायत पेमदरा, राजू शेठ आहेर युवा नेते अणे, माधव आग्रे, सावळेराम आहेर (माजी सैनिक) अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते, आणि नांदूर पठार या गावांमध्ये लोकनेते आमदार निलेश लंके साहेब पारनेर तालुका यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यती भरवण्यात आल्या व रात्री उद्घाटन समारंभ चा कार्यक्रम पार पडला त्यानंतर सर्वांना स्नेहभोजन आमटी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र शेठ राजदेव माजी सरपंच नांदूर पठार यांचा मोठा सहभाग व मेहनत हे सर्व दिसून आले त्यानंतर रवींद्र शेट राजदेव यांना सर्वांनी पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.