सरपंच सेवा संघातर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने त-हाडीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई धनगर यांचा गौरव

 


*सरपंच सेवा संघातर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने  त-हाडीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई धनगर यांचा गौरव

* त-हाडी ता. शिरपूर दि.२४ ( प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे*):* सरपंच सेवा संघ राज्यस्तरीय पुरस्कार यांच्या तर्फे दरवर्षी राज्यातील गावात ग्रामपंचायतीच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याची गावातील विकास कामे व विविध योजना यासाठी सतत कार्यशील राहून काम करणाऱ्या सरपंचाची दखल घेत  राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येते यावर्षी त-हाडी गावातील प्रथम लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई सुनील धनगर यांना अहमदनगर येथे 20 मार्च रोजी राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार पद्मश्री पुरस्कार प्राप्त बीजमाता पारनेरचे आमदार निलेश लंके साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मानचिन्ह देण्यात आले. त्या वेळी उपस्थिती पारनेरचे आमदार निलेश लंके साहेब संस्थापक यादवराव पावशे .विश्वत सुजाता कासार .प्रदेशाध्यक्ष रोहित पवार .बाबासाहेब पावशे. महिला अध्यक्ष प्रमिला एखंडे उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने