*"गलंगी"ला दर बुधवारी भरणार मोठ्ठा आठवडे बाजार..शेजार पाजारच्या गाव लोकांनो तुमचाही वाचणार वेळ व पैसा..व्यापाऱ्यांची दमदार होणार रेलचेल..!*
गलंगी ता.चोपडा दि.२४ (प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी ): तालुक्यातील गलंगी येथे सरपंच - उपसरपंच सदस्य व गावकऱ्यांच्या पुढाकाराने नुकताच आठवडे बाजारास दर बुधवारी प्रारंभ झाल्यामुळे आजूबाजूच्या खेड्यापाड्यांतील जनतेची मोठी सोय होणार आहे तरी व्यापारी बांधवांनी आपली दुकाने थाटून जनसेवेत सहभाग घेऊन व्यापाराची रेलचेल वाढवावी असे आवाहन पंचायतीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.तसेच ताई -माई , आक्का दादा नाना,आजा यांना बाजारासाठी तालुक्याच्या गावाला जाऊन वेळ वाया घालवायची गरज नसून आपल्या भागातच "गलंगी" ला मोठ्ठा बाजार खुलत राहणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे
याबाबत माहिती अशी,गलंगी येथे आठवडे बाजाराची सुरुवात झाली असून दर बुधवारी बाजार भरण्यास प्रशासकीय स्तरावरुन परवानगी देण्यात आली आहे. सरपंच शितल देवराज व उपसरपंच रामराव देवराज यांच्या परिश्रमाने गलंगी येथे आठवडे बाजाराचे गावकऱ्यांचे स्वप्न पूर्णत्वास आले आहे यासाठी हेमंत वाणी, किरण देवराज ,गोपाल देवराज, ग्रामपंचायत सदस्य उज्वलाबाई
भिल ,सुंदरबाई देवराज, सुशिलाबाई बाविस्कर व ग्रामसेवक सोनवणे यांनी सहकार्य केले. आठवडे बाजाराच्या सुरुवातीला आजूबाजू परिसरातील व्यापारी वर्ग यांनी दिला उत्तम प्रतिसाद तरी बुधवार बाजाराच्या दिवस ठेवण्यात आला असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आपला माल स्वतः विक्री करण्यासाठी यावे व व्यापारी वर्गाने सुद्धा बाजाराच्या उपयोग घ्यावा असे आवाहन हेमंत वाणी व सरपंच उपसरपंच यांनी केले आहे.
गलंगी येथील ग्रामस्थांनी व अनेर परिसरातील लासुर ,हिसाळा ,तोंदे ,होळनांथा वेळोदे व घोडगाव चोपडा येथील व परिसरातील शेतकऱ्यांनी आपला माल विक्री करून आपला व्यवसाय वाढवावा अशी विनंती गलंगी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
