स्वराज्य प्रतिष्ठान लांजाच्यावतीने खानवली करंबेळी वाडी येथे ग्रामस्थांच्या अंधार वाटेवर केला सौर ऊर्जा पोल लावून प्रकाश

 


स्वराज्य प्रतिष्ठान लांजाच्यावतीने खानवली करंबेळी वाडी येथे ग्रामस्थांच्या अंधार वाटेवर केला सौर ऊर्जा पोल लावून प्रकाश

कोकण ,दि.१५ (शांताराम गुडेकर ) लांजा तालुक्यातील खानवली गाव करंबेळी वाडी येथील ग्रामस्थांच्या मुख्य रहदारीच्या वाटेवर असलेल्या घरांना अतिशय बिकट परिस्थिती निमार्ण झाली होती. ती म्हणजे रात्रीच्या वेळी पायवाटेने अतिशय खडतर प्रवास करावा लागत होता. आणि खऱ्या अर्थाने प्रसंग जिथे आणि स्वराज्य प्रतिष्ठान तिथे असे धावून आले ते म्हणजे लांजा तालुक्यातील स्वराज्य प्रतिष्ठान ( स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. मा. ऋषीनाथ दादा पत्याने आणि स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. मा. विनायक दादा खानविलकर) अगदी या ग्रामस्थांन साठी धावून आले. आणि पत्रकार दिपक मांडवकर यांच्या या प्रसंग मागणी नुसार खानवली करंबेळी वाडी येथील ग्रामस्थांना एक सौर ऊर्जा पोल देऊन(दि.१४ मार्च २०२२) ग्रामस्थांच्या पायाखाली झाला असलेला अंधार कायमचा दूर केला.वाडीतील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून आला. त्या क्षणी वाडीतील ग्रामस्थ श्री तुकाराम मांडवकर यांच्या हस्ते अध्यक्ष श्री विनायक खानविलकर यांना सन्मानित केले. तर मा. संस्थापक श्री. ऋषीनाथ दादा पत्याने यांची उपस्थिती महत्वाची वाटत असताना महत्वाच्या कामा निमित्ताने बाहेर असल्याने त्यांचा देखील सन्मान श्री. जगन्नाथ सतोपे यांच्या हस्ते श्री. विनायक खानविलकर याना देण्यात आला. तर त्या क्षणी प्रमुख ग्रामस्थ म्हणून श्री. विकास शिंदे, श्री शिवाजी शिंदे व अन्य मंडळी उपस्थित होती. त्या वेळी श्री. विनायक खानविलकर यांचे आभार पत्रकार दिपक मांडवकर यांनी मानले तर श्री विनायक खानविलकर यांनी भाषणात सांगितले की, ग्रामस्थांच्या प्रत्येक अडचणी साठी मा. ऋषीनाथ दादा पत्याने यांचे स्वराज्य प्रतिष्ठान लांजा सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे संबोधित केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने