यावल तालुका एकात्मिक विकास समन्वयक व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर सोनवणे
मनवेल ता.यावल दि.१५(प्रतिनिधी गोकुळ कोळी) : यावल तालुका एकात्मिक विकास समन्वयक व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी जि.प.गटनेते तथा तालुका काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर नारायण सोनवणे यांची निवड करण्यात आली. तालुका स्तरावरील ही उच्च समिती मानली जाते.
यासाठी विविध राजकीय पदाधिकारी, शैक्षणिक व शासकीय अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी जळगाव यांनी ही निवड केली आहे. तर माजी.प.स.उपसभापती लिलाधर चौधरी (भालोद),माजी कृषि उत्पन बाजार समीती सभापती नितीन व्यकट चौधरी,मुकेश येवले (यावल),शिवसेना तालुका प्रमुख रविद्र सोनवणे ,जयश्री पाटील सांगवी,ललीता चौधरी फैजपुर ,प्रेरणा भंगाळे यांच्या सदस्यपदी नेमणुका करण्यात आल्या आहेत. तहसीलदार हे या समितीचे सचिव म्हणून कामकाज पहाणार आहेत.
या समितीमार्फत ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण आणि व्यापक विकास घडवून या हेतूने आणि विशेषत: समाजातील अविकसित कामावर अधिक भर देण्यात येणार आहे.