ग्रामविकास अधिकारी बी .के .पारधी यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड

 


ग्रामविकास अधिकारी बी .के .पारधी यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड

मारुळ ता. यावल दि.१६(प्रतिनिधी) जळगाव जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या व्हाईसचेअरमन पदी  अटॢऻवल/मारुळ ता. यावल येथील ग्रामविकास अधिकारी बि के पारधी यांची बिनविरोध निवड झाल्या बद्दल ग्रामपंचायत कार्यालय मारुळ येथे त्यांचे सत्कारपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुळ गावचे  तरुण तडफदार कर्तव्यदक्ष सरपंच असद सैय्यद होते  तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद जळगाव चे गटनेते जि. प. सदस्य तथा भारतीय कॉग्रेस पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, कॉग्रेस नेते व संजय गांधी समितीचे सदस्य जावेद अली सैय्यद, मल्टी परपज सह. सोसायटीचे चेअरमन जियाउलहक सैय्यद उपसरपंच पती सलामत अली सैय्यद व सर्व ग्रा. प. सदस्य होते यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी बि के पारधी यांचा शाल व गुच्छ देऊन सन्मानित करून सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळू तायडे, मतिउर  रहेमान पिरजादे, कबीर उद्दीन फारुकी ख्खाजा मोईनुद्दीन युवराज इंगळे, संतोष तायडे, संजय तायडे, कारकुन परवेझ सैय्यद व सर्व कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने