भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे असंघटित कामगारांसाठी मोफत ई-श्रम कार्ड शिबिर
जळगाव दि.१६ ( प्रतिनिधी )केंद्र सरकार व रोजगार मंत्रालय भारत सरकार कडून असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी ई - श्रम कार्ड योजना राबवित आहे या अंतर्गत जळगाव जिल्हा व जळगाव महानगरातील सर्व ऑटो रिक्षा चालक , विद्यार्थी वाहतूक चालक, फळे भाजी विक्रेते, कलावंत, सुतार, इमारत बांधकाम कामगार , रस्त्यावरील विक़ेते शेत मजूर घरगुती कामे करणारे कामगार यांच्या सह असंघटित क्षेत्रातील कष्टकरी कामगारांची ई- श्रम कार्ड योजने मध्ये नोंदणी करून सर्वांत आधी
सरकारी योजनांचा लाभ ई-श्रम धारकांना मिळावा सर्व कामगारांचा डाटा बनवून प्रत्येकाला ओळख पत्र दिले जाईल यासह सरकार द्वारा सामाजिक सुरक्षा योजना राबविल्या जातील तसेच दोन लाखांचा विमा ही दिला जाईल यासाठी
माजी मंत्री आमदारमा. गिरीश भाऊ महाजन भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार मा. राजु मामा भोळे खासदार मा. उन्मेष दादा पाटील भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक भाऊ सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनानेभारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर , भारतीय जनता पार्टी्अनुसूचित जमाती मोर्चा, भाजपा जळगाव महानगर ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडी, भाजपा जळगाव महानगर हॉकर्स आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा भगवे वादळ महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोनवणे भाजपा जळगाव महानगर ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडी अध्यक्ष प्रमोद भाऊ वाणी भाजपा जळगाव महानगर हॉकर्स आघाडी अध्यक्ष प्रभाकर तायडे यांच्या नेतृत्वात
माजी मंत्री आमदार मा. गिरीश भाऊ महाजन यांचे संपर्क कार्यालय जि. एम. फाऊंडेशन जि. एस. ग्राऊंड समोर जळगाव येथे सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मोफत ई-श्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
या शिबिरासाठी विनोद भाऊ कुमावत भरत भाऊ वाघ संदिप भाऊ वाणी सुनील भाऊ जाधव संजय पाटील
सुनील चौधरी प्रमोद भाऊ बाविस्कर ताराचंद पाटील दिलीप वाघ सुनील वाणी किशोर मोरे किशोर साळूंखे पद्माकर पाटील दिपक सोनवणे नितीन विसपुते रमेश सोनार यांच्या सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते परिक्षम घेत आहे