यावलच्या शिक्षण विभागाला दहावी व बारावीच्या परिक्षा केन्द्रावर कुठलेही प्रकारचे भेटीचे आदेश नसतांना भेटी कशासाठी ? पं .स .मासिक सभेत चर्चा

 


यावलच्या शिक्षण विभागाला दहावी व बारावीच्या परिक्षा केन्द्रावर कुठलेही प्रकारचे भेटीचे आदेश नसतांना भेटी कशासाठी ? पं .स .मासिक सभेत चर्चा

मनवेल ता. यावल दि.०९(प्रतिनिधी) : यावल पंचायत समिती सदस्यांची अखेरची  मासिक सभा पंचायत समितीच्या सभापती सौ .पल्लवी पुरुजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेत शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारावर विशेष करून लक्ष वेधणारी चर्चा करण्यात आली . या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नात आदेश नसतांना तालुक्यातील बारावी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात आल्याचे दिसून येत आहे .                                 शिक्षण विभागाच्या भरारी पथकाचे कुठलेही आदेश नसताना परीक्षा केंद्रांना भेटी का दिल्यात ? आपली बीट सोडून दुसऱ्या बिट मध्ये शाळा तपासणी चा उद्देश काय ?आपल्याकडे गटसमन्वयकचा पदभार आहे परंतु गटसमन्वयकाचे कार्य हे  एसएसए बाबत असताना आणि एसएसए मध्ये पैसा येत नाही त्याबाबत काम न करता  आपण शाळा भेटी कोणत्या उद्देशाने करीत आहात गटसमन्वयक यांनी सोमवार व शुक्रवार या दिवशी कार्यालयात हजर राहायचे असते आपण कार्यालयात हजर राहत नाहीत याबाबत बी आर सी कर्मचारी व शिक्षण विभाग लिपिक यांना बोलावून विचारणा केली असता ते कार्यालयात येतच नाहीत असे सांगण्यात आले ,भरारी पथकामध्ये आपणास आदेश नसताना केंद्रांना भेटी देणे चुकीचे असल्याचे आज झालेल्या पंचायत समितीच्या  शेवटच्या मासिक सभेत पंचायत समितीचे विरोधीगटनेते  शेखर सोपान पाटील व गटनेते दीपक अण्णा पाटील यांनी या बाबतीत शिक्षण विस्तार अधिकारी नईम शेख यांच्याशी विचारणा करीत त्यांच्या विभागाअंतर्गत होत असलेल्या अनधिकृत कारभाराविषयी विषयी विचारणा करीत कानउघाडणी केली .                                                  या विषयाची केंद्र शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार पंचायत समितीच्या सदस्य यांच्याकडे केली होती.                                       शिक्षण विभागाच्या वतीने केंद्र तपासणीचे अधिकार आदेश कुठल्याही प्राथमिक ,माध्यमिक शिक्षणाधिकारी ,तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी दिलेले नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. असे असतांना सुद्धा यावल तालुक्यात शिक्षण विभागाचा कोणता अधिकारी शाळा शाळांमध्ये फिरत आहे असून तपासणीच्या नावाखाली केंद्र संचालकांना त्रास देऊन पिळवणूक करीत आहे असे करण्यामागे त्या अधिकाऱ्यांचा काय उद्देश आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत.         जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे सभापतीपद हे यावल तालुक्याला मिळाले आहे . असे असुन, ही शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी एवढे मुजोर कसे आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे .                                 सदर यावल पंचायत समितीच्या शेवटच्या मासिक सभेत लोकप्रतिनिधी यांनी शिक्षण विभागाच्या अशा प्रकारच्या कारभारा विषयी प्रश्न उपस्थित केल्याने या बाबत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व गटशिक्षणाधिकारी काय कार्यवाही करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे .


चौकट 

साकळी केद्रातील केद्र प्रमुख प्रभारी आहे.वर्ग सांभाळून केद्र प्रमुख पदाच्या पदभार सांभाळावा,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यांची काळजी घेणे बंधनकारक असून सुध्दा केद्र प्रमुख आदेशा कडे दुर्लक्ष करीत असल्याचे दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु आहे.

कोवीड १९ च्या प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सर्वत्र सुरु झाल्या असून आदीवासी दुर्गम भागातील शाळा बंद आहे की चालु याकडे आधिकारी वर्ग फीरुवूनही पहात नसल्यामुळे शिक्षक शाळेवर जाता की नाही यांची खात्री होत नाही.याकडे गटशिक्षणअधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने