*बापरे बाप..! बांधकाम ठेकेदाराकडून ४३ लाख ७५ हजारांची मागली लाच..पहिला हप्त्या पोटी ४ लाखांची लाच घेताना जि.प. उप अभियंता व सहाय्यक अभियंता यांचेसह खाजगी ईसमास रंगेहाथ पकडले.. अक्कलकुवासह नंदुरबार जिल्ह्यात प्रचंड खळबळ*



*बापरे बाप..!  बांधकाम ठेकेदाराकडून ४३ लाख ७५ हजारांची मागली लाच..
पहिला हप्त्या पोटी ४ लाखांची लाच घेताना जि.प. उप अभियंता व सहाय्यक अभियंता यांचेसह खाजगी ईसमास रंगेहाथ पकडले..
अक्कलकुवासह नंदुरबार जिल्ह्यात प्रचंड खळबळ* 


नंदुरबार दि.२३( प्रतिनिधी) शासकीय मान्यताप्राप्त व नोंदणीकृत बांधकाम ठेकेदारांकडून आठ कोटी पंचेचाळीस लाख एकोन्नवद हजार रुपये ( 8,45,89,000/- रुपये) अंतिम देयके मंजूर करून    84,00,000/- रुपये ऊर्वरीतअनामत रक्कम राखुन ठेऊन रक्कम मिळणेकामी त्रेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये ( 43,75,000/- रुपये ) एवढ्या रकमेची लाचेची मागणी करत पहिल्या हप्त्या पोटी चार लाख रुपयांची लाच घेतांना अक्कलकुवा जिल्हा परिषदेचे उप उप अभियंता, सहाय्यक अभियंता व एका खाजगी मध्यस्थी इसमास लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडल्याने जिल्हाभर प्रचंड खळबळ उडाली आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात लाच मागण्याची जिल्ह्यात पहिलीच घटना घडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुरुष, वय -  59 वर्षे  हे तक्रारदार  शासकीय मान्यताप्राप्त व नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार आहेत. तक्रारदार यांना जिल्हा परीषद अंतर्गत अक्कलकुवा उपविभाग मार्फत भगदरी येथील गुरांच्या दवाखान्याची नवीन ईमारत बांधणे ,  रस्ता सुधारणा , रस्ता जलनिस्सारणाची कामे व ईतर 45 कामांचे कार्यारंभ आदेश मिळाले होते व नमुद सर्व कामे तक्रारदार यांनी पुर्ण केली आहेत. सदर कामांबाबत  सुनील, दिगंबर पिंगळे, वय 48 वर्ष, उप उपविभागीय अभियंता, श्रेणी-1 जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, अक्कलकुवा जि. नंदुरबार व संजय बाबुराव हिरे, वय 52 वर्ष, सहाय्यक अभियंता श्रेणी-2, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अक्कलकुवा जि. नंदुरबार यांनी तक्रारदार यांचे एकूण आठ कोटी पंचेचाळीस लाख एकोन्नवद हजार रुपये ( 8,45,89,000/- रुपये) अंतिम देयके मान्य केली असुन यापैकी एकुण सात कोटी एकसष्ट लाख एकोन्नवद हजार रुपये ( 7,61,89,000 /- रुपये)  एवढी रक्कम तक्रारदार यांना प्राप्त झाली आहे. तसेच एकुण मान्य रकमेपैकी  ऊर्वरीत  84 लाख ( 84,00,000 /- रुपये) एवढी रक्कम सदरील अभियंत्यांनी  राखून ठेऊन तक्रारदार यांना मुद्दामहुन अनामत रक्कम राखुन ठेवली असे सांगीतले. सदरची 84,00,000/- रुपये ऊर्वरीत रक्कम मिळणेकामी तक्रारदार यांनी वेळोवेळी जि.प. बांधकाम उपविभाग कार्यालय अक्कलकुवा येथे उप अभियंता सुनील पिंगळे  व सहाय्यक अभियंता एस बी हिरे  यांना भेटून ऊर्वरीत देयकाची रक्कम मिळणे कामी विचारणा केली असता त्यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी या आधी अदा केलेल्या देयकांबाबत च्या रकमेच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून उप अभियंता सुनील पिंगळे  यांनी तीस लाख पन्नास हजार रुपये ( 30,50,000/- रुपये)  व शाखा अभियंता एसबी हिरे  यांनी तेरा लाख पंचवीस हजार रुपयांची ( 13,25,000/- रुपये) अशी एकुण त्रेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये ( 43,75,000/- रुपये ) एवढ्या रकमेची मागणी केली. तसेच मागणी केलेली रक्कम/ पैसे दिले नाही तर तुमचे उर्वरित देयके तुम्हाला भेटू देणार नाही असे सांगीतले. तसेच तक्रारदार यांनी सदरील अभियंत्यांना  वरील नमुद रक्कम द्यावी याची हमी म्हणुन तक्रारदार यांचेकडून दोघानी  जळगाव जनता सहकारी बँक शाखा नंदुरबार या बँकेचे 30 लाख 50 हजार  रुपयांचा चेक/धनादेश व तेरा लाख 25 हजार रुपयांचा चेक/धनादेश असे दोन चेक/धनादेश दिनेश यादवराव सोनवणे या   ओळखीच्या इसमाचे नावाने लाचे पोटी लिहून घेऊन त्यांचे ताब्यात ठेवले व रोख रक्कम आणून दिल्यानंतर सदरचे दोन्ही चेक/धनादेश परत करून देऊ असे सांगितले होते.   त्यानुसार सुनील दिगंबर पिंगळे जि.प.बांधकाम उप अभियंता वर्ग -1     व एस बी हिरे जि.प. बांधकाम सहाय्यक अभियंता  वर्ग -2 यांनी तक्रारदार यांच्याकडून 43,75,000/- रुपये (43 लाख 75 हजार)  लाचेची मागणी करून तडजोडी अंती   प्रथम हप्ता / टोकन रक्कम 4,00,000/- रुपये आज दि.23.03.2022 रोजी लाच घेतांना लाच  लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले.

ही धडाकेबाज कारवाई श्री. सुनील कडासने , ( पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक.) श्री. नारायण न्याहाळदे ., (अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक) व श्री. सतीश भामरे ., पोलीस उपअधीक्षक (वाचक) ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उप अधीक्षक, राकेश आ. चौधरी, ( ला.प्र.वि., नंदुरबार)सह सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक, समाधान महादू वाघ, (ला.प्र.वि, नंदुरबार) पोलीस निरीक्षक, माधवी एस. वाघ,( ला.प्र.वि. नंदुरबार) यांनी यशस्वीपणे पार पाडली.

याकामी पोह/उत्तम महाजन, पोहवा/विलास पाटील, पोहवा/विजय ठाकरे, पोना/अमोल मराठे पोना/ संदीप नावाडेकर,  पोना/ देवराम गावित, मपोना/ ज्योती पाटील व चापोना/ जितेंद्र महाले सर्व नेम. ला.प्र.वि., नंदुरबार.यांचे पथकाने मेहनत घेतली .खान्देशात सर्वात मोठी लाचेची मागणी केल्याची कारवाई प्रथम झाली असून या कारवाईने लाच घेणाऱ्यांमध्ये कमालीचे धाबे दणाणले आहे. लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांसह पथकाचे नागरिकांनी जोरदार कौतुक केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने