*अतिक्रमित जमिन नावे करून देण्यासाठी लासुरवासियांचे तहसीलवर उपोषण*
चोपडा दि.२३(प्रतिनिधी): तालुक्यातील लासुर या गावातील पंपनगर गट नं.९९५/२ या जागेवरील अतिक्रमण नियमित करून तेथील रहिवासिंना त्यांचे नावे जागा लावून मिळावी या मागणीसाठी आज दि.२२ रोजी तहसीलदार यांचे कार्यालय चोपडा येथे उपोषणाला बसावे लागले आहे.
याबाबत निवेदनात दिलेली सविस्तर माहिती अशी की,लासूर ता.चोपडा जि.जळगांव येथील गट नं.९९५/२ मध्ये ४० वर्षापासून अनेक रहिवासी हे अतिक्रमण करून रहिवास करीत आहेत.सदर अतिक्रमण जागा त्यांच्या नांवे होण्यासाठी त्यांनी शासनाकडे वर्गणी भरणा केलेला असून सी.टी.सर्वेकडून सदर जागेची मोजणी झालेली आहे.परंतु त्यानंतर दोन वर्षापासून पुढील कोणतीही कारवाई झालेली नाही.म्हणून पुढील कार्यवाही त्वरित करून सदरची जागा शासनाच्या रेकॉर्डला आमच्या नांवे लावण्यात यावी या मागणीसाठी सदर रहिवासी २२ मार्च २०२२ रोजी तहसिल कार्यालय, चोपडा येथे उपोषणास बसले आहेत.या संदर्भात दि.१४ मार्च रोजी तहसीलदार यांना याविषयी निवेदन देण्यात आले होते. तरी आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून आम्हास न्याय मिळावा अशी मागणी उपोषणकर्ते पिताराम गुपसिंग बारेला यांनी केली आहे.
निवेदनावर दिलीप नेवला बोरला,धनसिंग पुण्या बारेला,फुलाबाई युवराज भील,रतीलाल विक्रम भिल,भादु भिला भील,रनसींग नेवला बोरला,गोविंदराम बुट्या बारेला,तुकाराम गुपसिंग बारेला, रमेश धनसिंग बारेला,लकडया सरदार बारेला,जितेंद्र गुपसींग बारेला,सुमारीबाई गेलसींग बारेला,फुलसिंग खजान बारेला, रामसींग मोहण भील,परशुराम तापिराम भील,कैलास बारका बारेला,कासीनाथ चुन्या सुभाराम गुपसिंग बारेला,अनिल भोगा बारेला आदींच्या सह्या वजा अंगठ्याचे ठसे आहेत.