शेवरे बु. येथे आदीवासी बांधवांचा भोंगऱ्या उत्साहात : रंगबिरंगी पेहरावात ढोलच्या तालावर आबालवृद्ध थिरकले

 


शेवरे बु. येथे आदीवासी बांधवांचा भोंगऱ्या  उत्साहात  : रंगबिरंगी पेहरावात ढोलच्या तालावर आबालवृद्ध थिरकले 

धानोरा ता. चोपडा दि.१६ (प्रतिनिधी):  शेवरे बु. (ईच्छापूर) ता. चोपडा  येथे सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यातून पायथ्याशी एकत्र होऊन आदीवासी बांधवांनी आपला पारंपरिक सण भोंगऱ्या मोठ्या उत्साहात साजरा केला. यात रंगबिरंगी पेहरावात ढोलच्या तालावर आबालवृद्ध थिरकले.

    १६ रोजी सकाळपासून शेवरे बु. ईच्छापूर येथे आपापल्या पाड्या वस्त्यांच्या ढोल पथकाचे आगमन झाले. त्यात रंगबिरंगी पेहराव परिधान करून आबालवृद्धांनी नृत्याविष्कार करीत भोंगऱ्या सणाचा आनंद घेतला. येथे कुंड्यापाणी, पांढरी वनगाव , पानशेवडी शेवरे बु., ऋषी पाडा, धुपामाय पाडा, चांदण्या तलाव , पटचारी अडावद, धानोरा, निमतावली पाडा, आंबापानी या वस्त्यांवरून  ढोलसह आदीवासी बांधव सहभागी झाले. या बाजारात मोठया प्रमाणावर दाळ्या, फुटाणे, गोडशेव, जलेबी , संसारोपयोगी साहित्य, खेळणी, कटलरी, झुले आदी व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटलेली होती.   वर्षभरात होळीच्या सणानिमित्त भरणाऱ्या भोंगऱ्या बाजारात सर्व आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर एकत्र होतात. यामुळे चैतन्य निर्माण होते.

      या कार्यक्रमासाठी आदिवासी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संजय शिरसाठ, वरगव्हानचे सरपंच भुषण पाटील, उपसरपंच निमा बारेला, वडगाव बु.चे उपसरपंच नामदेव पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

  या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी  प्रताप बरेला , गणदास बारेला , गेलसिंग बारेला,  बालसिंग बारेला,  नायजाबाई पावरा,  गुड्या पावरा, देवसिंग पावरा, खेलसिंग बारेला, रुपसिंग पावरा, संजय बारेला, डोंगरसिंग बारेला, गजीराम  बारेला, बाटीबाई बारेला, नरसाबाई पावरा, मुकेश बारेला, खजान बारेला, मधू भिल यांनी प्रयत्न केले.

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने