सावरखेड दि.१६ (प्रतिनिधी धिरज खेडेकर):खेमकुंड येथील 33 वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली,किशोर नारायण शिंदे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार 15 तारखेला मृतक दारू पिऊन होता ,तो घरी दगड फेकून मारत असताना मृतक यांची पत्नी मुला सह अभिमान शिंदे यांच्या घरी गेली ,तू परत आली नाही तर मी आत्महत्या करतो असे म्हणून मृतक घराकडे निघून गेला त्यानंतर दि.16 ला सकाळी 6 वाजता कान्हू बाजीराव शिंदे यांच्या शेता जवळील डांबरी रस्त्या लगत झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसला .या बाबत फिर्यादी नरेंद्र गणपत शिंदे यांनी वडकी पोलिस स्टेशन ला माहिती दिली,पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रमेश आत्राम,संदीप मडावी करीत आहे.