सेंद्रीय शेतीची चळवळ व्हायला हवी ..!जामनेरला भारतीय किसान संघाच्या चर्चासत्रात महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री चंदन पाटील यांचे प्रतिपादन
जामनेर दि.१८(प्रतिनिधी): उत्पादन आणि मागणी यांचा समतोल नसल्याने शेतकरी भरडला जात असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वालंबी व्हायला हवा. पीक आणि उत्पादनाचे नियोजन व्हायला हवे, हरीतक्रांतीनंतर शेतकरी संपुर्णपणे सरकारवर अंवलंबून आहे. शेतकर्यांनी आत्मनिर्भर होण्याची गरज असून सेंद्रीय शेतीचे प्रत्येक तालुक्यात केंद्र उदयास येऊन सेंद्रीय शेती चळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री चंदन पाटील यांनी केले. जामनेर येथे वैदीक गो शाळेत भारतीय किसान संघातर्फे आयोजित चर्चासत्रात मार्गर्शन करतांना ते बोलत होते.
मंगळवारी महिल्या दिवशी अभ्यास वर्ग, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री चंदन पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष कपीलाताई मुठे, जिल्हाध्यक्ष वैभव महाजन, जिल्हा मंत्री डॉ. दिपक पाटील, कार्यकारणी सदस्य मनोहर बडगुजर यांच्या हस्ते भारत माता, बळी राजा यांच्या पुजनाने करण्यात आला.
ते पुढे म्हणाले की, शेतकर्यांना सोपी व आनंदी अशी शेती करता आली पाहिजे. शेतकर्यांची शेतीवर आधारीत सुक्ष्म प्रक्रिया उद्योग उभे राहायला पाहिजे. जेेणेकरून कच्चा माल गावातच त्यांच्यावर प्रक्रिया होऊन तो पक्का होईल. सेंद्रीय शेतीत देशी वाणाच्या बियाण्याची निर्मिती होणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेतीत नवनवीन प्रयोग व्ंहायला हवेत. तसेच शेतकर्यांनी एक जिल्हा एक उत्पादन याप्रमाणे जिल्ह्यात शेती पीकाचे नियोजन करावे. शेतकर्यांना मोफत किंवा सवलतीत वीज मिळाली पाहिजे. सध्यास्थितीत शेतकरीत ३० ते ४० टक्के तोट्याने शेतमाल विक्री करीत आहे. त्यामुळे शेतातील पीकावर होणारा खर्च लक्षात घेता लाभकारी मुल्यावर आधारीत शेतकर्यांच्या शेतमालाला बाजारभाव मिळण्याची गरज असल्याचे चंदन पाटील यांनी सांगितले. यावेळी भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव महाजन, जिल्हामंत्री डॉ.दीपक पाटील, कोषाध्यक्ष श्रीकांत नेवे, जिल्हा प्रचारप्रमुख रामदास माळी, जिल्हा युवा प्रमुख राहूल बारी, योगिता महाजन, श्रीकांत श्रीखंडे, विकास चौधरी, गणेश पाटील, किशोर महाजन, सुमित पाटील , सुनिल पाटील, मनोहर पाटील, अरूण पुजारी, दिपक पुजारी, किरण पाटील, भगवान परदेशी, जयदीप पाटील, राजेंद्र महाजन, सचिन बोराडे, शिवदास शिंदे, अमोल धनगर, राजेंद्र बडगुजर, सुनिल महाजन आदी उपस्थित होते.
शेतकर्यांनी बचतीकडे लक्ष द्यावे
शेतकरी वर्षभर राबराब राबतो. उत्पादन घरात येत नाही, तोपर्यंत देणेदारी मोठ्या प्रमाणात होऊन जाते. त्यामुळे शेतमालाच्या माध्यमातून पैसा घरात येईपर्यंत त्यात शेतातील खर्चाचे देण्याची रक्कम मोठी होऊन जाते. त्यात बियाण्यापासून तर शेतमाल घरात येईपर्यंत त्यांचा मोठा खर्च झालेला असतो. परिणामी त्यातूून पैसा वाचत नाही. त्यामुळे शेतकर्यांची बचत होत नाही. मात्र शेतकर्यांची आत्मनिर्भर होण्यासाठी बचतीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे चंदन पाटील यांनी स्पष्ट केले.
शेतकर्यांनी शेतीत वेगवेगळ्या प्रयोगावर भर द्यावा
स्वातंत्र्यानंतर शेती आणि गाव यांच्या विकासाला प्राधान्य देणार्या योजना येणे अपेक्षित होते. भारत हा खेड्याचा देश आहे. शेतकरी स्वत: एक शास्त्रज्ञ आहे. त्यामुळे शेतीत शेतकर्यांनी प्रयोगावर भर देण्यात यावी. विद्यापीठ, शास्त्रज्ञ सांगतील तीच शेतीवर शेतकर्यांनी भर दिला आहे. मात्र त्यामाध्यमातून उत्पादीत केलेल्या शेतमालाच्या विक्रीतून मिळणार्या अत्यल्प बाजारभावामुळे शेतीतून शेतकर्यांना अर्थाजन होत नसल्याने चंदन पाटील म्हणाले. शेतकर्यांची शेती नफ्यात आल्याशिवाय शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वालंबी होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.