देवगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक यशवंत पवार यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव



  देवगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक यशवंत पवार यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव 

तामसवाडी, ता. पारोळा दि.०८( प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव बॉइज येथील शिक्षक यशवंत पवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. श्रीकांत पाटील कोल्हापूरकर यांच्या हस्ते मुक्ताईनगर येथे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

तामस वाडी ता पारोळा येथील सुपुत्र व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव बॉईज येथील उपशिक्षक यशवंत पवार यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल बाल किशोर व युवा मराठी पाहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलनात शिव चरण उज्जेणकर फाउंडेशन.यांच्या तर्फे मराठी राज भाषा दिना निम्मित तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2021 राष्ट्र पती पुरस्कार प्राप्त डॉक्टर श्रीकांत पाटील कोल्हापूरकर यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी यास पिठावर प्रमुख पाहुणे म्हणून माझी महसूल मंत्री एकनाथराव खडसे , तसेच जेष्ठ साहित्तिक व सुप्रसिद्ध कथाकार डॉक्टर सत्तीश तराड डॉक्टर जगदीश पाटील,डॉक्टर कृष्देव गिरी कोल्हापूर , कवी तुळशीराम बोबडे, डॉक्टर शिव चरण उज्जैन कर प्रा. विनायक वाडेकर ,डॉक्टर शुभांगी करपे प्रा. ज्योती राणे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार संगीता उज्जैन कर यासह सर्व फाऊंडेशनचे संचालक व विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. यशवंत पवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्या बद्दल एरंडोल विधानसभा मतदार.संघाचे आमदार मां. चिमणराव पाटील ,जिल्हा बँक संचालक अमोल पाटील जिल्हा परिषद सदस्य रोहन पवार देवगाव गावाचे सरपंच समीर पाटील ,आधार पाटील डॉक्टर मनीष पाटील सचिन पाटील, तसेच पारोळा पंचायत समितीच्या गट.शिक्षणाधिकारी कविता सुर्वे एरंडोल धरणगाव चे गट शिक्षण अधिकारी विश्वास पाटील जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सी एम चौधरी तामस वाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख करुणा देवकर पारोळा पछिम सोसायटीचे संचालक अनिल फुलचंद पाटील मुख्याध्यापक शै लेश गिरासे दीपक पाटील. चदात्रे सर प्रवीणजी कोळी.सर आकाश बड गुजर सर संजू सर वैशाली जोशी मॅडम व सर्व शिक्षक स्टाफ यांनी अभिनंदन व कौतुक केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने