दोन वर्षांच्या विरामानंतर यंदा आदिवासींचा भोंगऱ्या सणाची जय्यत तयारी.. भोंगऱ्या बाजारात उसळणार तोबा गर्दी*
चोपडा दि.०८(प्रतिनिधी): होळीच्या दरम्यान येणारा आदिवासींचा भोंगऱ्या सण दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच साजरा होणार आहे. त्यामुळे आदिवासींमध्ये उत्साह आहे.
दरवर्षी साजरा होणारा भोंगऱ्या कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत साजरा होऊ शकला नाही. यावर्षी मध्य प्रदेशात भोंगऱ्या बाजाराला बंदी असल्याचे आदिवासींमध्ये बोलले जात आहे. परिणामी महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या बाजारात आदिवासी बांधव मध्य प्रदेशातूनही हजेरी लावण्याची शक्यता आहे.
सोमवारी (दि. ७) सकाळी १० वाजता अडावद येथे भोंगऱ्या. साजरा करण्याच्या ठिकाणी शरभंग ऋषिपाडा येथे आदिवासी बांधवांनी गुलाल उधळला. यावेळी संजीव शिरसाठ, मीरा कोलटेके (अमरावती), पी. आर. माळी, सचिन महाजन, देवसिंग पावरा, मधू भिल, गुडा पावरा, पांढरी, खेलसिंग बारेला (बिरसापाडा रामजीपाडा), गनदास बारेला (शेवरे इच्छापूर), गेलसिंग बारेला (शेवरेपाडा), बालसिंग बारेला (धुपामाय), बिराम बारेला (मनापुरी), बियानू बारेला, नका बारेला (वाघझिरा), खुमसिंग बारेला, कालू पावरा, रायसिंग पावरा, गजिराम पावरा (उनपदेव), ताराचंद पाडवी, गाठ्या पावरा (ताराघाटी), खजान पावरा, प्रकाश पाडवी (बोरमळी), भीमा पावरा (बोरपाडा), किरण देवराज, दिनेश पावरा आदींसह आदिवासी बांधव उपस्थित होते.