राज्यपालांच्या त्या वक्तव्याचा चोपड्यात निषेध निवेदन




राज्यपालांच्या त्या वक्तव्याचा चोपड्यात निषेध निवेदन

 चोपडा दि.०२(प्रतिनिधी)   *राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या छ.शिवरायांच्या प्रति केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा निषेध तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करणे बाबत चोपडा येथील शिवप्रेमींचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे

 महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी कार्यरत असलेले भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे दिनांक २७-०२-२०२२ रविवार रोजी एका जाहीर कार्यक्रमात विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या समोर राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबत "अगर संत रामदास नही होते तो शिवाजीको कोन पहिचानता?-संत रामदास शिवाजीके गुरु थे" अश्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत व खोटा इतिहास सांगत महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.

रामदास व छत्रपती शिवराय यांच्या संबंधित  मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोरील क्रिमिनल अर्ज क्रमांक ९९५/२००८ मध्ये १६ जुलै २०१८ रोजी मे.न्यायालयाने सुस्पष्ट निकाल दिला असताना छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा  व त्यांच्या महानकर्तृत्वास नाकारण्याचा प्रयत्न भगतसिंग यांनी करून अक्षम्य गुन्हा केला आहे.म्हणून राज्यपाल श्री भगतसिंग कोशारी यांच्यावर तक्रार नोंदवण्यासाठी विनंती करणारे तसेच त्यांच्या वक्तव्याचा निषेध करणारं निवेदन चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या वतीने ए.पी.आय.अजितकुमार सावळे यांनी शिवप्रेमींकडून स्वीकारले.

यावेळी प्रा.संदीप पाटील,श्री.भटू पाटील,श्री.प्रकाश पाटील,श्री.अनिल वानखेडे,श्री.विकास पाटील,श्री.प्रमोद बोरसे,डॉ.रोहन पाटील,प्रा.महेंद्र बोरसे,श्री.नरेंद्र महाजन,श्री.दिव्यांक सावंत,श्री.हरिश्चंद्र देशमुख,श्री.रमेश पवार,प्रा.प्रदीप पाटील,श्री.एकनाथ पाटील,श्री.धनंजय पाटील,श्री.संदीप पाटील,श्री.कुलदीप पाटील,श्री.उपेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने