शासकिय माध्यमिक आश्रम शाळा देवझिरी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.. इयत्ता 10 वी च्या विध्यार्थ्यांना निरोप
चोपडा दि.०९(प्रतिनिधी) शासकिय माध्यमिक आश्रम शाळा देवझिरी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला .महिला दिनाचे अच्युत्त्य साधून इ 10 वि च्या विध्यार्थ्यांना निरोप देण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री सुनिल चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक श्री गडे सर श्री साळुंखे सर श्री गायकवाड सर श्री मोतीराम सर श्री राजू सर श्री जितेंद्र पावरा सर श्री पावरा सर श्री तुकाराम सर यांनी भूषविले कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमांचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले . त्यानंतर शिक्षक श्री गायकवाड यांनी स्वरचित कविता वाचून भूतकाळात होऊन गेलेल्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला . जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील स्त्री अधिक्षिका श्रीमती अर्चना कोळी, व इ 10 वि च्या विदयार्थीनी यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला . त्यानंतर अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांची जीवनकहाणी ध्वनीफितद्वारे विदयार्थ्यांना ऐकविण्यात आली .तदनंतर इ 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाईकरव सर यांनी केले तर आभार अधीक्षक गडे यांनी मानले