*चोपडा मतदार संघातील भीषण पाणीटंचाई असलेल्या १७ गावांचा पिण्याच्या पाण्याची समस्या खल्लास.. सुपरफास्ट आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अथक प्रयत्नाने १० कोंटींचा निधी मंजूर..* *"जलजीवन मिशन"मुळे हर घरं पिण्याच पाणी* *सर्वाधिक निधी आडगाव व साकळीला.. कोटींच्या घरात*
चोपडा दि.१८(प्रतिनिधी)धडाधडीच्या कार्यसम्राट आदिवासी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अथक प्रयत्नाने व.. कार्य सम्राट माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या दूरदृष्टीने चोपडा विधानसभा मतदारसंघात पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या कडे विविध गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या मांडून मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याने अखेर १७ गावांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे."जलजीवन मिशन" अंतर्गत हर घरं नळ ..अन् पिण्याला शुध्द पाणी मिळणारं असून पिण्याच्या पाण्यासाठी तरसणाऱ्यांची पाण्याची तहान भागणार आहे. मतदार संघातील रस्ते , वीज व पाणी मुख्य गरजांना प्राधान्य देऊन सर्वांगिण विकास साधण्याचा प्रयोग राबविला जात असून अनुमान काढण्याचा प्रश्न च् ठेवला जात नसल्याने मतदार राजा जाम खूश झाला आहे.कधी नव्हे एव्हढा डोळे विस्फारणारा निधी मंजूर झाल्याने या गावांच्या पाणी प्रश्न कायमचा संपुष्टात येणार आहे.म्हणून तालुक्यातील भंकप दर्पोक्ती करणाऱ्यांनी विकास करणाऱ्यांचा आदर करत स्वाभिमानाने विकास कार्याचा गौरव करण्याची वेळ येऊन ठेपली असल्याची दमदार चर्चा नागरिकांतून होत आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक घरात नळाचे शुद्ध पाणी पोहोचविण्याच्या संकल्पानुसार 'जलजीवन मिशन' राबविण्यात येत असून, या योजनेंतर्गत चोपडा विधानसभा मतदारसंघात १७ गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत ३३६ कोटी ५३ लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद जळगाव जिल्ह्या करिता करण्यात आली आहे. त्यापैकी चोपडा मतदार संघासाठी जवळपास १० कोटीचा निधी मंजूर झाला आहे अचूक नियोजन करून आपल्या गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे आवाहन आमदार सौ.लताताई सोनवणे यांनी केले आहे केले. पहिल्यांदाच पाण्यासाठी एव्हढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे
गावातील प्रत्येक विकासकाम हे महत्त्वाचे असले तरी रस्ते, गटारी, पथदिवे आदींपेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे पाणी होय. गावात पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असल्याने गावाच्या इतिहासात कायमस्वरूपी नोंदले जाणार आहे. यामुळे सर्व सरपंचांनी आपल्या सहकाऱ्यांसह ही योजना जागरूक आणि तत्पर राहून पूर्ण करावी, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
पाणीपुरवठा योजनांची मंजुरी देण्याची घटना ही जिल्ह्यात पहिल्यांदाच घडली आहे. या माध्यमातून जिल्ह्यात खऱ्या अर्थाने जल क्रांती निर्माण करण्याचे काम पाणीपुरवठा मंत्र्यांनी केले असल्याची भावना देखील सौ.ताईंनी व्यक्त केली आहे.
चोपडा मतदार संघातील विविध गावांचे मंजूर पाणीपुरवठा योजनांचे मंजूर निधी गावनिहाय आकडेवारी अशी, अजंतीसीम -रु.४९.५५ लक्ष, वडती -रु.६८ लक्ष, बोरखेडा -२८ लक्ष, आडगाव- रु.१ कोटी ९३ लक्ष , पुनगाव -रु.५२.५७ लक्ष, वडगाव बु.-७२.२९ लक्ष , दगडी बु.- २०.६९ लक्ष, विटनेर- रु.७७.९७ लक्ष, मनवेल- रु.४९.८८ लक्ष, महेलखेडी- रु.७५.८० लक्ष, शिरागड -रु.३०.१९ लक्ष, उंटावद - रु.३०.७६.लक्ष, साकळी- रु.१ कोटी २५ लक्ष, डोणगाव- ३०.४८ लक्ष या अवाढव्य निधी मुळे या १७ गावांमधील भीषण पाणीटंचाई कायमची दूर होणार आहे.