*चोपडा येथे बौद्ध महासभा मार्फत शिवाजी महाराज जयती निमित्त अभिवादन*





*चोपडा येथे बौद्ध महासभा मार्फत शिवाजी महाराज जयती निमित्त अभिवादन*

चोपडा दि.१९( प्रतिनिधी)दि.१९/२/२०२२ शनिवार रोजी चोपडा येथे दि.बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा शहर व चोपडा तालुक्याच्या वतीने महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती साजरी करण्यांत आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष भरत शिरसाठ व तालुकाध्यक्ष बापूराव वाणे यांच्या माल्यार्पण केले. व जयंती निमित्त संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने १००० वृक्ष लावण्याचे उदिष्ट्ये ठेवून सावित्रीबाई फुले हायस्कुल समोर पिंपळ,वडाचे झाडे संदिपभैय्या पाटील, माजी आमदार कैलासबापू पाटील,नगराध्यक्षा मनिषा चौधरी,उपनगराध्य भुपेंद्रभाई गुजराथी,गोपाळराव सोनवणे,निलेश भालेराव यांच्या हस्ते लावण्यांत आले.

       सदर कार्यक्रमास जिल्हा संघटक हितेंद्र मोरे,तालुकाध्यक्ष बापूराव वाणे,शहराध्यक्ष भरत शिरसाठ,उपाध्यक्ष छोटूभाऊ वारडे,देवानंद वाघ, दिपक मेढे,रामचंद्र आखाळे,आदि कार्यकारिणी सभासद बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने