विष्णापुर गावाच्या ईतिहासात पहिल्यांदा रक्तदान शिबीर; तरूणांचा उस्फूर्त प्रतिसाद
चोपडा दि.२०(प्रतिनिधी)तालुक्यातील विष्णापुर या गावी ईतिहासात पहिल्यांदाच रक्तदान शिबीर पार पडले असुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विष्णापुर या गावात रक्तदान शिबीर आयोजित केले होते. शिबीराच्या आदल्या दिवशी गावात जयेश सोनवणे व त्यांच्या तरूण मित्रपरिवाराने गावात जनजागृती करून रक्तदानाचे फायदे गावकऱ्यांना समजावून सांगितले. शिबीरात गावातील असंख्य तरूणानी शिवजयंती निमित्त रक्तदान केले. शिवजयंती निमित्त रक्तदान करून गावातील तरूणांनी येणाऱ्या पिढीला राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श निर्माण करण्याचे कार्य या युवांनी केला आहे.
या शिबीराला युवक व ग्रामस्थांचा उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास ५० हजार रूपयांचा एक्सीडेंन्टल विमा व रक्तदात्याला स्वतःला रक्ताची गरज लागल्यास मोफत रक्त देण्यात येणार आहे. शिबीराचे आयोजन हे गावातील तरुण मुलांनी केले होते. या शिबीराला वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व वैद्यकीय मदत कक्षाचे सह-समन्वयक भावेश ढाके यांचे सहकार्य लाभले.
या भव्य रक्तदान शिबीराला आयोजक जयेश सोनवणे, किरण माळी यांच्यासह निलेश सोनवणे, कल्पेश शिंदे, लोकेश शेटे, राकेश बत्तीशे, अभय माळी, जयेश कोळी आदींनी रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.