सहकार गटाचे अध्यक्ष श्री उदय मधुकर पाटील यांचीआगामी ग.स.सोसायटी प्रचारार्थ चोपडा शहरातील विविध शाळांना सदिच्छा भेट

 




सहकार गटाचे अध्यक्ष  श्री उदय मधुकर पाटील यांचीआगामी ग.स.सोसायटी प्रचारार्थ चोपडा शहरातील विविध शाळांना सदिच्छा भेट

चोपडा दि.,२०(प्रतिनिधी)

*सहकार गटाचे अध्यक्ष बापुसो श्री उदय मधुकर पाटील यांनी आगामी ग.स.सोसायटी,जळगांव निवडणुक २०२२ च्या प्रचारार्थ चोपडा शहरातील विविध शाळांना सदिच्छा भेटी दिल्या.*

           *यावेळी प्रताप विद्या मंदीर,चोपडा येथे आपली भुमिका विषद करतांना सहकार गटाने ग.स.पतपेढी च्या वाटचालीत दिलेले योगदान व संस्था आणि सभासदांच्या हितासाठी राबविलेल्या योजना यासंदर्भात माहिती देतांना भविष्यात संस्था-सभासदांच्या हितासाठी विविध योजना आणण्याचा मनोदय व्यक्त केला.*

        *याबरोबरच गटाचे संस्थापक अध्यक्ष स्व.बी.बी.आबांनी आपल्या कार्यकाळात संस्थेत दिलेल्या भरीव योगदानाची आठवण याप्रसंगी करुन देतांना चोपडा तालुक्याने प्रत्येक निवडणुकीत सहकार गटाच्याच पारड्यात झुकते माप दिलेले आहे.तो पायंडा कायम ठेवावा अशी विनंती करतांना पुर्वी सभासदांच्या चोपडा येथील सहविचार सभेत या निवडणुकीत एकाही गद्दाराला उमेदवारी देणार नाही.याप्रमाणे आगामी निवडणुकीत सहकार गटाकडुन आयाराम-गयाराम करणाऱ्या एकाही माजी संचालकाला उमेदवारी दिलेली नसुन आपणही असल्या उमेदवारांना त्यांची जागा दाखवून देण्याचा विचार करावा.व सहकार गटाला ग.स.पतपेढीची प्रतिमा मलिन करणाऱ्या माजी संचालकांना थारा न देता संस्थेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.*

           *यावेळी गटनेते श्री अजबसिंग पाटील यांनीही उपस्थित सभासदांपुढे आपली भुमिका मांडली.*

             *याप्रसंगी  सहकार गटाचे श्रेष्ठी तात्यासो श्री रमेश एकनाथ शिंदे,जिल्ह्याचे शिक्षक नेते,गटाचे श्रेष्ठी भाऊसाहेबसो.श्री आर.एच.बाविस्कर सर उमेदवार श्री महेश विठ्ठलराव पाटील,श्री देवेंन्द्र भास्कर पाटील,श्री मंगेश रमेश भोईटे विद्यालयाचे समन्वयक श्री गोविंदभाई गुजराथी,प्राचार्य श्री आर.आर.शिंदे, उपमुख्याध्यापक श्री प्रशांतभाई गुजराथी सर,विकास शिर्के पाटील,मिलिंदभाई गुजराथी,श्रीमती सुनंदा वारडे मॕडम,सचिन करमरकर,पाठक सर,अमर पाटील,पंकज शिंदे,शेख सर,अभिजित पाटील यासह शिक्षक-शिक्षकेतर उपस्थित होते.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने