*पंकज इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शिव जयंती उत्साहात साजरी*
चोपडा दि.२० (प्रतिनिधी ):---
येथील पंकज इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेचे प्राचार्य संदीप वडनेरे अध्यक्षस्थानी होते.तर पालक प्रतिनिधि म्हणून हेमंत शर्मा उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले.
या प्रसंगी चिमुकल्या विद्यार्थी - विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थिती लावली. इयत्ता १ ली व २ री च्या विद्यार्थिनींनी "झुलवा पाळणा बाल शिवाजीचा " व इयत्ता ५ वी व ६ वी च्या विद्यार्थिनींनी "माय भवानी" या गाण्यावर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी महाराजांच्या चित्र रेखाटन स्पर्धेत भाग घेतला . इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी थर लावून नृत्य सादर केले . विद्यार्थ्यांनी ढोल ताशा वाजवून कार्यक्रमाची रंजकता वाढवली.
शाळेचे चित्रकला शिक्षक निखिल कोळी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे सुरेख चित्र रेखाटले. तसेच सहाय्यक शिक्षक प्रतीक चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाराजांच्या विचारांना आणि त्यांच्या जीवन चारित्र्याला उजाळा देण्यात आला. भारतीय इतिहासातील महाराजांच्या महत्त्वपूर्ण योगदाना संदर्भातील आठवणींना उजाळा देण्यात आला. महाराजांच्या गडकिल्ल्या विषयी माहिती आणि त्यांची रचना याविषयी किशोर पाचवणे यांनी माहिती करून दिली. विद्यार्थ्यांनी गड किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवून सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. अनिता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक दानिश शेख यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. रंजना तायडे , अनिता पाटील ,भावना भाट ,शितल भावसार ,तस्नीम शेख ,गणेश साळुंखे, किशोर पाचवणे ,दानिश शेख ,नितीन बाविस्कर ,निखिल कोळी , प्रतीक चौधरी, बाळू पाटील , सुलभा पाटील आदींनी परिश्रम घेतले.