*आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव साजरा..सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रितपणे घेतला सहभाग*

 

*आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत  शिवजयंती उत्सव साजरा..सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रितपणे घेतला सहभाग*



चोपडा दि.२०(प्रतिनिधी): -
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते  माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
  याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, शहरप्रमुख आबा देशमुख, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, नगरसेवक महेश पवार , नगरसेवक राजाराम पाटील, नगरसेविका सौ संध्या महाजन, प्रवीण जैन,  सुनील भाई बरडिया , नगरसेवक प्रकाश राजपूत, नगरसेवक किशोर चौधरी, दीपक चौधरी यांच्यासह अनेक सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी माल्यार्पण करून छत्रपतींना अभिवादन केले
शिव जयंती निमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हा सोहळा सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रितपणे साजरा केला.

सदर कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. कार्यक्रमासाठी मोठा जनसमुदाय उसळला होता. शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यात पोलीस उपविभागीय अधिकारी भास्कर डेरे, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण, एपीआय अजित साळवे, घनश्याम तांबे यांनी मोठा व चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने