*ज्ञानगंगा कडून वत्सगुल्म नगरीतील समाजसेवी गुणीजनांचा ज्ञानमुर्तीने गौरव !*


 *ज्ञानगंगा कडून वत्सगुल्म नगरीतील समाजसेवी गुणीजनांचा ज्ञानमुर्तीने गौरव !*


 कारंजा दि.०१( वाशिम प्रतिनिधी अंकुश मुंदे)  स्थानिक ज्ञानगंगा साहित्य मंडळ कारंजा कडून, प्रजासत्ताक दिनानिमित्त ,वत्सगुल्म नगरीतील अष्टपैलू बहुआयामी व्यक्तिंना, ज्ञानगंगा साहित्य मंडळाच्या प्रतिष्ठेच्या, "ज्ञानमूर्ती " राज्यस्तरीय पुरस्काराने, चंद्रभानजी शिंदे सर , देवेशजी देशमुख, प्रवीण बाजड, संजय डहाळे, संदिप डोंगरे, आकाशवाणी वार्ताहर  सुनिल कांबळे यांना संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे तथा शहर अध्यक्ष उमेश अनासाने यांचे हस्ते, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह तथा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात, वत्सगुल्म नगरी वाशिम येथील समाजसेवी गुणीजनाचा, सन्मानसोहळा, तरुण क्रांती मंच वाशीमचे जिल्हाध्यक्ष, निलेश सोमाणी यांचे अध्यक्षतेखाली तथा विशेष उपस्थित पाहूणे, मराठा सेवा संघ प्रणित - संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष हभप श्रीकृष्ण महाराज राऊत यांचे उपस्थितीत ज्ञानमुर्तीने गौरविण्यात आले . तसेच आकाशवाणी वार्ताहर तथा पत्रकार सुनिल कांबळे यांना सुद्धा ज्ञानमुर्तीने गौरविण्यात आले हे विशेष . यावेळी सत्कारमुर्ती यांनी आयोजक व उपस्थितांना, अविरत मानवसेवा करण्याविषयी आश्वासित करीत आयोजकांचे आभार मानले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने