अडावद सेवाकेंद्रात आमदार निधीतून हायमास्ट लँम्प

 



अडावद सेवाकेंद्रात आमदार निधीतून हायमास्ट लँम्प

अडावद ता.चोपडा दि.०१(प्रतिनिधी)- येथील कृष्णाजी नगरातील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राच्या आवारात माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यमान आ.सौ.लताताई सोनवणे यांच्या  स्थानिक विकास निधी अंतर्गत मिनी हायमास्ट पोल नुकताच उभारण्यात आला. अडावद गावातील हि सर्वात जुनी नववसाहत आहे.गेल्या २५ वर्षापासून या नगरीत अद्याप एक ही आमदार निधीतून विकास कामे झालेली नव्हती मात्र माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांनी दिलेला शब्द पाळत येथील स्वामी समर्थ केंद्राच्या आवारात हायमास्ट लँम्प बसवून वचनपूर्ती केल्याने समाधान व्यक्त होत आहे. यासाठी लोकनियुक्त सरपंच सौ.भावनाताई महाजन,उपसरपंच सौ.भारतीताई महाजन,पी.आर.माळी,सचिन महाजन, यांच्या सहकार्याने कृष्णाजी नगरातील विकासकामांची खरोखरच महुर्तवेढ रोवली गेल्याचे म्हटले जात आहे. याप्रसंगी निळकंठ पाटील,प्रेमराज पवार,जयप्रकाश पाटील,सुनिल पाटील,जितेंद्रकुमार शिंपी ,अशोक लोहार,विनोद पाटील,रतिलाल पाटील,सुधाकर  पाटील,सुर्यकांत पाटील,जयवंत पाटील,जितेंद्र पाटील,रविंद्र पवार,रविंद्र पाटील आदीसह कृष्णाजी नगरातील असंख्य रहिवासी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने