गोरगरीबांचा सच्चे लढवय्ये कॉ.अमृतराव महाजन यांचे दुःखद निधन..आज अंत्ययात्रा
चोपडा दि.११(प्रतिनिधी) : भारतीय कम्युनिष्ठ पार्टी ऑफ इंडिया (CPI) जळगाव जिल्हा अध्यक्ष काँ. अमृतराव तुकाराम महाजन रा.चिंच चौक, महात्मा फुले नगर.. (वैजापूर रस्ता) चोपडा यांचे काल दिनांक १०/१२/२०२५ बुधवार रोजी रात्री ९:०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक ११/१२/२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता चिंच चौक वैजापूर रस्ता चोपडा येथून निघेल.ते लेनीन महाजन यांचे वडिल होत.
कै.श्री.अमृतराव महाजन महाजन हे कोणताही राजकिय वारसा नसतांना कोणत्याही संस्थेचे पदाधिकारी नव्हते तरीही प्रस्थापिता विरुद्ध सातत्याने गोर गरीब , वंचित, शोषीत, आदिवासी उपेक्षीत घटकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे एक सच्चे आंदोलक होते .हातावर पोट असणाऱे फेरीवाले व टपरीधारकांचे पुरोगामी विचारांचे सच्चे नेता होते.त्यांनी आज पर्यंत अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी लढा देऊन अनेकांना न्याय मिळवून दिला होता. जळगाव जिल्ह्यात समाजवादी विचारसरणीचे गोर गरीबांचे स्वच्चे नायक म्हणून त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे . निस्वार्थपणे गरिबांच्या हक्कासाठी लढा देणारे लढवय्ये हरपल्याने आज जिल्ह्यात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.अशा सच्चा नेत्यांस पत्रकार महेश शिरसाठ व झटपट पोलखोल परिवार तीव्र दुःखात सहभागी असून त्यांच्या परिवारावर कोसळलेले दुःख पेलण्याचे बळ परमेश्वर देवो ही प्रार्थना..! कॉम्रेड अमृतराव महाजन यांना शेवटचा लाल सलाम..! भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹🌹
