चोपडेकरांनो आता डाळ,भात व भाजी पोळी खायला चला..तेही फक्त २० रुपयांत..! उद्या पासून शुभारंभ..प्रेरणा दर्पण फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
चोपडादि.०२ ( प्रतिनिधी ) - येथील सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणारी प्रेरणा दर्पण फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने अडल्या,नडल्यामानवांसाठी सेवा तत्वावर केवळ २० रुपयांत डाळ,भात,भाजी,पोळी ही अन्नसेवा संकल्पना बऱ्याच प्रयत्नांती अखेर समाजासाठी सुरू करण्यात येत असून जुने जतन हॉस्पिटल येथेदि.२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष मा. श्री.अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.निर्मल टाटीया,सौ.सपनाटाटीया,यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार आहे. यावेळी माजी आ.कैलासबापू पाटील,चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथीऍड.संदीपभैय्या पाटील,जिल्हा बँकेचे संचालक घनश्यामभाई अग्रवाल,नगराध्यक्षा सौ. मनिषाताई चौधरी,सभागृहनेते जीवनभाऊ चौधरी,मुख्याधिकारी अविनाश गांगोडे,घनश्यामअण्णा पाटील,डॉ.विकासकाका हरताळकर,डॉ.सुरेश बोरोले, व्यापारी संघटनेचेअध्यक्ष अमृतराज सचदेव, तहसीलदार अनिल गावीत,पो.नि. अवतारसिंग चव्हाण,अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, रोटरी अध्यक्ष पंकजभैया बोरोले,दिया गॅस एजन्सीचे संचालक नितीनआबा पाटील, सौ.इंदिराताई पाटील,मेहमूद बागवान,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष जगनकाका पाटील,डॉ.पराग पाटील,डॉ.राहुल पाटील डॉ.दीपक पाटील,डॉ.चंद्रकांत बारेला,डॉ.दिलीप पाटील, डॉ.आनंद पाटील,पीपल बँक व्हा.चेअरमन प्रवीण गुजराथी,महावीर पतसंस्थेचे चेअरमन प्रा.शांतीलाल बोथरा, नेमीचंद जैन,सुनील बुरुड,जैन समाजाचे संघपती सुभाषचंद बरडीया, गुलाबचंद देसरडा, शिवसेनेचे आबा देशमुख, विकास देशमुख,राजेन्द्र (बिटवा) पाटील, संजय कानडे,जैन दादावाडी अध्यक्ष बाबुलाल बोथरा,दगडू अग्रवाल,रॉयल एजन्सीचे संचालक सैय्यद अमजदभाई, ज्ञानेश्वर भादले,रवींद्र भादले, गोल्ड हाऊसचे संचालक उमेदमल टाटीया,संजीव बाविस्कर,भटू भाऊ पाटील,राम सोमाणी,दिनेश लोडाया, पी.बी.पाटील,(इंजिनिअर),अनिल वानखेडे,अरुण प्रल्हाद सोनवणे, राजेशभाई शर्मा,भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा, यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.अन्नसेवा या सामाजिक उपक्रमासाठी मदत करणाऱ्या मान्यवरांचा याप्रसंगी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात येणार असून,सर्व गरजू व्यक्तींनी अन्नसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.निर्मल टाटीया,सचिव लतीश जैन,अध्यक्ष शाम जाधव व संचालक मंडळ यांनी केले आहे.