*चोपडा येथील ग.स.संचालक श्री देवेंद्र पाटील यांचे सेट परीक्षेत घवघवीत यश*
चोपडा (प्रतिनिधी ) यु जी सी अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे. विद्यापीठामार्फत सेट परीक्षा दिनांक 26 सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत चोपडा येथील श्री देवेंद्र पाटील हे शिक्षणशास्त्र विषयासाठी पात्र ठरले आहेत. त्यांना पेपर 144 गुण तर पेपर 2 (शिक्षण शास्त्र) 102 गुण प्राप्त झाले असून ते महाविद्यालयीन असिस्टंट प्राध्यापक प्रत्येक (शिक्षणशास्त्र) पदासाठी पात्र ठरले आहेत.देवेंद्र पाटील हे जि.प. शाळा चोपडा याठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असून ते ग.स. सोसायटी जळगाव येथे संचालक आहे. त्याचप्रमाणे त्यांनी गट साधन केंद्र, पंचायत समिती चोपडा. येथे १२वर्ष विषयतज्ञ, गटसमन्वयक म्हणून काम केले आहे. त्यांनी विविध प्रशिक्षणांमध्ये राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.