विद्यार्थिनी पद्मजा पाटील हिने सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्याने प्रताप विद्या मंदिरात शिवजयंती उत्सवात रंगत

 


विद्यार्थिनी पद्मजा पाटील हिने सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्याने प्रताप विद्या मंदिरात शिवजयंती उत्सवात रंगत 


चोपडा दि.२०(प्रतिनिधी) - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात इ. 8 वी ची विद्यार्थिनी पद्मजा पाटील हिने सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्याने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे एक व्यक्ती नसून ते देव होते. त्यांनी धर्माचा प्रचार न करता धर्म टिकवून ठेवला. आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच सुस्थितीत आहोत. असामान्य व्यक्तिमत्त्व, मराठी साम्राज्याचे संस्थापक, एक आदर्श शासनकर्ता आणि सर्वसमावेशक सहिष्णू जाणता राजा म्हणून वंदिले जाणारे राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव आहेत. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, प्रसंगावधानी, रयतेचा पालनकर्ता, गनिमीकावा तज्ञ,  कुशल शासनकर्ता व मुत्सद्दीपणा असलेले व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय, असे प्रतिपादन व्याख्याते ए. एन.भट यांनी केले. 



ते म्हणाले की, खरे नेतृत्व लोकांना एकत्र आणण्याचे कार्य करते हेच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी केले. प्रजेचे सुख-दुःख ते आपले सुख दुःख अशी जाणिव असणारे शिवाजी महाराज होते. लोकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे कौशल्य त्यांच्यात लहानपणापासूनच होते. ते मुसद्दीपणाचे एक द्योतकच होते. शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग त्यांनी सोदाहरण सांगितले. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक आर.आर.शिंदे यांनी इतिहासातील प्रेरणादायी घटना सांगितल्या. शिवाजी महाराजांच्या अंगी स्वामीनिष्ठतेचे, कर्तव्यनिष्ठतेचे, सर्वधर्मसमभाव आदि गुण पाहावयास मिळतात असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या वेळी कला शिक्षक पंकज नागपुरे यांनी  शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेले फलक लेखनाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला मुख्याध्यापक आर.आर.शिंदे, उपमुख्याध्यापक पी.एस.गुजराथी, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य जे.एस.शेलार, पर्यवेक्षक एस.जी.डोंगरे, माधुरी पाटील, एस.एस.पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.पी.वारडे यांनी तर आभारप्रदर्शन उपमुख्याध्यापक पी.एस.गुजराथी यांनी केले. संगीत शिक्षक पी.बी.कोळी यांनी सादर केलेल्या शिव स्तवनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने