छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कुरूकवाडे व सावता परिषद धुळे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कुरूकवाडे व सावता परिषद धुळे जिल्हा यांच्या संयुक्त  विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर 


धुळे दि.२० (प्रतिनिधी)छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कुरूकवाडे व सावता परिषद धुळे जिल्हा यांच्या संयुक्त  विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दोंडाईचा पोलिस स्टेशन येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. संतोष लोले, दादा साहेब रावल कॉलेजचे  प्राचार्य डॉ. के. डी. गिरासे पंचायत समितीचे सदस्य दुल्लभ नाना सोनवणे नगरसेवक चिरंजीवी चौधरी, सावता परिषद धुळे जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर माळी शिंदखेडा तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सरपंच प्रतिनिधी प्रकाश पाटील सावता परिषद शिंदखेडा तालुका अध्यक्ष परमेश्वर माळी राजपूत वॉरियर्सचे ग्रुपचे संस्थापक हर्षल दादा राजपूत सावता परिषद दोंडाईचा शहर अध्यक्ष भाऊसाहेब माळी संभाजी सेना युवा अध्यक्ष राहुल पाटील डॉक्टर राकेश चौधरी हिरालाल सोनवणे  जतनसिंग गिरासे सुभाष हिरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉ.संतोष लोले साहेब व डॉ. के. डी. गिरासे सर यांनी मनोगत व्यक्त केले व रक्तदान काळाची गरज आहे हे तरुण मंडळींना समजून सांगितले व तरुण वर्गास मार्गदर्शन केले त्यानंतर डॉ. के.डी गिरासे सर यांनी देखील रक्तदान केले प्रत्येक गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आपणही समाजाचे काही देणे लागतो. त्यामुळे ग्रामपंचायत कुरुकवाडे व  विशाल भाऊ माळी सावता परिषद धुळे जिल्हा युवा अध्यक्ष तथा खानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळ शिंदखेडा तालुका अध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते शेवटी विशाल भाऊ माळी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने