*रामपुरा भागातील हनुमान मंदिर वर्धापनदिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा*
चोपडा दि.०२ ( प्रतिनिधी) शहरातील रामपुरा भागातील जय हनुमान मंदिर वर्धापनदिवस आज दि.०२ फेब्रुवारी २०२२ रोजी वर्धापन उत्साहपूर्ण वातावरणात भक्तीभावाने साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधत महाबली जय बजरंग बली यांच्या मृतीसह श्रीराम व इतर देवांना अभिषेक करण्यात आला, मुंबईहून कपडे आणण्यात आले व ते परिधान केले ! दुपारी 1 वाजता शोडोशोपाचार पूजा उपरांत महाआरती करण्यात आली.
त्यावेळी मंदिराचे पुजारी श्री.देवानंद वैद्य, सौ. मनिषा वैद्य, भक्ती वैद्य, मंदिराचे व्यवस्थापक श्री.शिवदास सोनवणे, सौ. यमुना सोनवणे, श्रीमती निर्मला सोनवणे, भक्ती सोनवणे, यांच्या सह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते!