*महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन शिरपूर विस्तारासाठी चर्चासत्र संपन्न.!*


 *महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन  शिरपूर विस्तारासाठी चर्चासत्र संपन्न.!*


मलगाव दि.२१ (प्रतिनिधी-गणेश खर्डे  ):

    शिरपूर तालुक्यातील व धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन (MADA), संघटना शिरपूर तालुका कार्यकारणी विस्तारासाठी नियोजित बैठक व चर्चासत्र शासकीय विश्रामगृह शिरपूर येथे आयोजित करण्यात आले.

    ह्यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. माडा संघटना मजबुतीसाठी, जास्तीत जास्त डॉक्टर्स व सामाजिक जाण असलेले वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. सामजिक कोणत्याही अडचणीत सक्षम असलेली माडा आहेच त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे त्यामुळे सामाजिक अडचणीत व आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचणींना मात करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.

    येत्या काही दिवसांत माडा चे अध्यक्ष डॉ.राजेश वळवी सर व राष्ट्रीय कार्यकारणी टीम ह्यांचे हस्ते नवीन कार्यकारणीतील सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.

    ह्यावेळी डॉ.प्रताप पवार, डॉ.हिरा पावरा, डॉ.संदीप वळवी, डॉ.भरत पावरा, डॉ.विनोद पावरा, डॉ.बन्सीलाल पावरा, डॉ.हेमंत पावरा, डॉ.सुभाष पावरा, डॉ.बाबुलाल पावरा, डॉ.संजय पावरा, डॉ.शेरसिंग कनोजे, डॉ.महेश पावरा आदि उपस्थित होते.

    ह्यावेळी डॉ.हिरा पावरा ह्यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने