*चोपडयात अवघ्या १० वाजेच्या सुमारास लूटपाटचा प्रकार..तेही बसस्थानकावर.. पोलिसांनी* *आरोपींना अटक करुन काढली धींड..तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी*
चोपडादि.०१(प्रतिनिधी) : चोपडा शहरातील बस स्थानकाजवळ ओमनी गाडीची लूटमार करत दरोडेखोरांनी सहा हजार तीनशे रुपये रोख पळवत चोपडा शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. सदर आरोपींना शहर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. लूटमार व दहशत माजविनाऱ्या आरोपीची चोपडा शहर पोलीसांनी चोपडा शहरात मुख्य बाजार पेठेतून कान पकडुन धिंड काढून चांगलीच अद्दल घडवली आहे. आरोपीस जेव्हा पोलिस मुख्य बाजार पेठेतून फिरवत होते तेव्हा बघ्यांची तोबा गर्दी होती. अनेकांनी आरोपीचे फोटो काढत सदर घटनेचा आनंद लुटला.
सविस्तर वृत्त असे की, आरोपी भैय्या पाटील यांचे विरूद्ध फिर्यादी हाऊन शेख कमरोददीन शेख यांची ओमनी गाडी क्र. एम एच 19.0929 हि चोपडा बस स्थानकाजवळ अडवून त्यांना आरोपी भैय्या पाटील व त्याचे सोबती तीन अनोळखी इसमांनी शिवीगाळ दमदाटी तसेच आरोपी टकल्या गवळी याने लाथानी मारहाण तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून फिर्यादी हाऊन शेख कमरोद्दीन शेख याच्या चष्मा तोडून आरोपी भैया पाटील व टकल्या गवळी यांनी फिर्यादी हारून शेख कमरोद्दिन शेख यांचे पॅन्टच्या खिशातील 6300 रुपये रोख काढून घेतले म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशनला फिर्यादी हाऊन शेख कम शेख वय 52 वर्ष टॅक्सी चालक रा. के जी एनकॉलनी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशन भाग 5, गुर नं 30/ 2022 भादवि कलम 395, 341, 323, 504, 506,427 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर घटनेतील आरोपी टकल्या गवळी यास
अमळनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सदर आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेच्या घटनास्थळी भास्कर डेरे (पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जळगाव व अतिरिक्त कार्यभार चोपडा भाग) तसेच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी भेट दिली आहे. पुढील अधिक तपास चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण हे स्वतः करीत आहेत.