घाटकोपर केंद्रावर राज्य नाट्य स्पर्धेचे उदघाटन जेष्ठ रंगकर्मी प्रमोद पवार व जनार्दन लवंगारे यांच्या प्रमुख उपस्थितित संपन्न


घाटकोपर  केंद्रावर राज्य नाट्य स्पर्धेचे उदघाटन जेष्ठ रंगकर्मी प्रमोद पवार व जनार्दन लवंगारे यांच्या प्रमुख उपस्थितित  संपन्न



मुंबई दि.२२(शांताराम गुडेकर )

        महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आयोजित ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा - २०२२ ची प्राथमिक फेरी केंद्र -घाटकोपर मुंबई येथील झवेरबेन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या राज्य नाट्य स्पर्धेचे उदघाटन जेष्ठ रंगकर्मी प्रमोद पवार व जनार्दन लवंगारे यांच्या प्रमुख उपस्थितित  संपन्न झाले.या कार्यक्रमाला घाटकोपचे विभागप्रमुख राजेन्द्र राऊत,माजी उपविभाग प्रमुख प्रकाश वाणी व अभिनेत्री नुतन जयंत यांची विशेष उपस्थिती होती. उदघाटन समारंभापुर्वी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा.ना.अमित देशमुख यांनी आँनलाईन प्रणालीने महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरील स्पर्धेचे उदघाटन केले.घाटकोपर येथे प्रथमच शासनाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन होत असल्याने रसिक प्रेक्षकांची चांगलीच उपस्थिती होती. ईशान्य मुंबई मधील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार असून राज्य नाट्य स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे.दिर्घ कालावधी नंतर पुन्हा एकदा राज्य नाट्य स्पर्धेची सुरुवात होते आहे. मा. सांस्कृतिक मंत्री श्री.अमित विलासराव देशमुख यांच्या सकारात्मक धोरणामुळे स्पर्धा संपन्न होणार आहे.मा. विभीषण चवरे (संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन )सरांच्या प्रयत्नतून यावर्षी प्रथमच ही स्पर्धा घाटकोपर येथील झवेरबेन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.त्या निमित्ताने घाटकोपर.चेंबुर.कुर्ला. विक्रळी येथील मराठी रसिक प्रेक्षकांना हक्काचे नाट्यगृह उपलब्ध होत आहे असे मत दिपक सावंत(समन्वयक, आणि व्यवस्थापक झवेरबेन सभागृह) घाटकोपर मुंबई यांनी व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने