श्रीमती मंजू सराठे यांना नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवार्ड-२०२२ जाहीर..९ मार्च २०२२ रोजी कॉन्फरन्स हॉल, जुने महाराष्ट्र सदन,नवी दिल्ली येथे होणार सत्कार

 



श्रीमती मंजू सराठे यांना नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवार्ड-२०२२ जाहीर..९ मार्च २०२२ रोजी कॉन्फरन्स हॉल, जुने महाराष्ट्र सदन,नवी दिल्ली येथे होणार सत्कार 


मुंबई दि.२२(शांताराम गुडेकर) बृहन्मुंबई महानगर नगर पालिका  कामराज नगर हिंदी शाळेच्या महापौर पुरस्कृत आदर्श शिक्षिका श्रीमती मंजू बी. सराठे यांना त्यांच्या उत्तम शैक्षणिक साहित्यिक व सामाजिक कार्यासाठी महिला दिनानिमित्त नॅशनल वुमन्स एक्सलेंस अवॉर्ड-२०२२ जाहीर झाला आहे. नॅशनल न्यूज फेडरेशन ऑफ इंडिया, सोशल वेलफेअर फाउंडेशन (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने हे अवॉर्ड ९ मार्च २०२२ रोजी कॉन्फरन्स हॉल, जुने महाराष्ट्र सदन,नवी दिल्ली येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मान.श्री रामदास आठवले जी उपस्थित राहणार आहेत तसेच विशेष अतिथी म्हणून सन्मा.श्री प्रियंक कानूनगो(चेयरमेन ऑफ एन सी पी सी आर), डॉ. ज्ञानेश्वर मुळे(राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत) , सन्मा.श्री जाकीर खान इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ.मनिष गवई, डॉ.आदिनारायण,श्री अजय प्रकाश, डॉ.मुदिता इत्यादी आयोजकांनी ही माहिती निमंत्रण पत्राद्वारे दिली आहे.

      श्रीमती सराठे यांनी कोरोनाचा झपाट्याने उद्रेक होत असताना अतिशय भयावह परिस्थितीत कोरोना योद्धा म्हणून उत्तम कामगिरी बजावली. कवितेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले. शालेय विद्यार्थ्यांना नेट पॅक साठी आर्थिक मदत व गरजू विद्यार्थ्यांना मोफत अन्नधान्य वितरीत केले. विद्यार्थ्यांना चित्र कला स्पर्धेत सहभागी करून सन्मानपत्राने सन्मानित केले. परीक्षक महत्त्वपूर्ण उत्तम कामगिरी बजावल्याने त्यांना वेद फाउंडेशनचे अध्यक्ष श्री स्वप्निल वाडेकर यांच्या हस्ते वेद सन्मानपत्र देऊन सन्मानित ही करण्यात आले आहे.

        कडाक्याची थंडी असताना आरे कॉलनीच्या आदिवासी क्षेत्रात जाऊन त्यांनी ब्लंकेट्सचे वितरण केले. गोरेगाव येथील विशेष व्याधिग्रस्त बालिकांच्या आश्रमात जाऊन मोफत अन्न व ब्लंकेट्स वितरण केले.

    विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने पुरस्कृत श्रीमती सराठेंची कामगिरी पाहता या अवाॅर्ड साठी शालेय शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने