*"Holistic Health"* म्हणजे *"सर्वांगीण विकास"* होय - डॉ. सौरभ राजन
चोपडा दि.२२( प्रतिनिधी ):---
पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा व न्यासा,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या आय.क्यु.ए.सी.व क्रीडा विभाग या द्वारे वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
Holistic Health या विषयावर आज दि.२१ फेब्रुवारी रोजी आयोजित वेबिनार मध्ये डॉ.सौरभ राजन यांनी आरोग्याचे महत्व विशद करताना श्वास नियंत्रणाची प्रक्रिया सविस्तरपणे मांडली तसेच उत्तम आरोग्य राहण्यासाठी नियमित व्यायाम योगासने यांचे महत्त्व सांगितले.आरोग्यावर चा खर्च शून्य कसा करावा यासाठी निरोगी व निरामय आरोग्याच्या टिप्स त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाघमोडे यांनी धकाधकीच्या जीवनात आरोग्याचे महत्व याविषयी माहिती दिली. या ऑनलाइन वेबिनारचे प्रास्ताविक डॉ.विजय पाटील यांनी केले.तर आभार डॉ.संजय पाटील यांनी मानले. या ऑनलाईन वेबिनार मध्ये महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला...