पथराडे जि.प,शाळेत गणवेश वितरण
मनवेल ता.यावल दि.२२(प्रतिनिधी गोकुळ कोळी):: पथराडे थेथील जि प प्राथमिक शाळेत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश संचाचे वाटप करण्यात आले.
गणवेश वाटप सरपंच सौ योगीताताई सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य श्री प्रतापदादा सोनवणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गणेश धिवर,उपाध्यक्ष श्री अजय सोनवणे,आशासेविका सौ मायाबाई धिवर,तसेच सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षणतज्ज्ञ,पालक यांच्या हस्ते करण्यात आले.सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री भुषण कुमावत यांनी परिश्रम घेतले.नवीन गणवेश यावर्षी उशिरा मिळाला असला तरी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता व पालकांनीही समाधान व्यक्त केले.