कोळन्हावी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामकृष्ण सोळंके
मनवेल ता.यावल दि.०३ (वार्ताहर ) येथून जवळच असलेल्या कोळन्हावी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे रामकृष्ण प्रकाश सोळंके (शिरागड) यांची तर व्हाईस चेअरमनपदी कैलास महारु सोळंके ( शिरागड ) यांची निवड करण्यात आली.
कोळन्हावी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी संस्थेच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक निवडणुक निर्णय अधिकारी डी.जे.तडवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत चेअरमनपदासाठी भागवत दगा सोळंके व रामकृष्ण प्रकाश सोळंके यांचे दोन अर्ज चेअरमनपदासाठी दाखल करण्यात आले होते.यात रामकृष्ण सोळंके यांना ८ मते तर भागवत सोळंके यांना पाच मते पडल्याने चेअरमनपदी रामकृष्ण प्रकाश सोळंके यांची तर व्हाईस चेअरमनपदी कैलास महारु सोळंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संचालक संतोष सोळंके, विलास सोळंके, आधार सोळंके, अनिल सोळंके ,मिराबाई सोळंके विमल सोळंके, मच्छिद्र सोळंके, सोपान सोळंके उपस्थित होते निवडणूककामी प्रशासक ए.टी.तायडे ,सचिव श्यामकांत साळवे यांनी सहकार्य केले.