*"राजा "प्रमाणे कार्य व "रामा" समान पुरुषार्थ बाळगत जनसेवा बजावणाऱ्या कै.बापूसाहेब राजाराम पाटील यांचा वर्षीश्राद्ध व श्रध्दांजली विधी कार्यक्रम १० फेब्रुवारीरोजी...* *तावसे खुर्द येथील मळ्यात जरूर या.. डॉ.आनंद पाटील यांची विनंती*


 *"राजा "प्रमाणे कार्य व "रामा" समान पुरुषार्थ बाळगत जनसेवा बजावणाऱ्या कै.बापूसाहेब राजाराम पाटील यांचा वर्षीश्राद्ध व श्रध्दांजली विधी कार्यक्रम १० फेब्रुवारीरोजी...* *तावसे खुर्द येथील मळ्यात जरूर या.. डॉ.आनंद पाटील यांची विनंती* 

चोपडा दि.०६(प्रतिनिधी): तालुक्यातील जनतेची मनोभावे सेवा बजावत आपल्या कार्याचा ठसा जनमानसावर उमटविणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कै.बापूसाहेब राजाराम बाबुराव पाटील यांचा वर्षी श्राद्ध व श्रध्दांजली विधी कार्यक्रम दि.१०/०२/२०२२रोजी सकाळी १०:००वाजता तावसे खुर्द गावी  बापूसाहेब यांच्या शेत मळ्यात आयोजित करण्यात आला आहे. 

 दरम्यान गेल्या वर्षी १४ मार्च २०२१ रोजी  बापूसाहेब राजाराम पाटील हे अल्पशा आजाराने देवाज्ञा झाले होते.तालुक्यातील गोरं गरिब जनतेची, आदिवासी बांधव व तळागाळातील लोकांची सेवा बापूसाहेब यांनी बजावत गरजूंना मदतीचा हात देऊन आपलेपणाचा मायेचा ओलावा दिला होता.या परोपकारी वृत्तीने जनतेच्या मनात ते नावाप्रमाणेच *"*राजा*"* होते.व *"रामा"* प्रमाणेच मर्यादा पुरुषोत्तम होते. राजाराम नावाची त्यांनी जणू बारकाईने जपणूक करत आपले नाव सार्थकी लावले आहे.त्यांनी कॉग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेऊन पक्ष निष्ठा जोपासत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले आहे.शेवटच्या क्षणापर्यंत कोणतेही गालबोट न लागू देता पक्षाची धुरा सांभाळली आहे.अनेक चढ उताराची कार्ये न डगमगता सांभाळून यशस्वीपणे पार पाडली आहेत.स्व: फायद्यासाठी कोलांट उड्या मारणाऱ्या नेत्यांना त्यांनी आपल्याजवळ ‌कधीही फिरकूही दिले नाही ही त्यांची खासियत होती.म्हणून आजही बापूसाहेब यांच्या पक्ष निष्ठा व प्रामाणिक पणाच्या आठवणींना अनेकांच्या तोंडून उजाळा मिळतो आहे.

त्यांच्या कार्याचे पाऊलावर पाऊल टाकत रुग्णसेवेचे व समाज हिताचा व्रत  मालती हॉस्पिटलचे संचालक त्यांचे चिरंजीव डॉ.दादासो. आनंद राजाराम पाटील व सूनबाई डॉ.सोनाली आनंद पाटील हे  जोपासत आहेत.त्यांच्या महान कार्यास डॉक्टर साहेबांच्या मातोश्री ग.भा.मालूबाई राजाराम पाटील, बंधू विवेक राजाराम पाटील व कुमूद  विवेक पाटील यांची मोलाची साथ लाभत आहे. 

तरी उपरोक्त वर्षी श्राद्ध व श्रध्दांजली विधी कार्यक्रमास नातलग, हितचिंतक,स्नेही जणांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.आनंद पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने