स्व.बाबासाहेब पुरंदरेंनी दिली होती लतादीदींच्या आजोळी उत्सुकतेपोटी भेट..जेष्ठ पत्रकार श्रीकांत नेवे यांनी दिला उजाळा
चोपडा दि.०६(प्रतिनिधी)- येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेने आयोजित १९९९ सालातील शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'जाणता राजा' महानाट्याच्या निमित्ताने स्व.बाबासाहेब यांनी स्व.लतादीदींच्या आजोळी थाळनेर (ता.शिरपूर) येथे उत्सुकतेपोटी भेट दिल्याच्या घटनेला जेष्ठ पत्रकार श्रीकांत नेवे यांनी उजाळा दिला.
स्व.बाबासाहेब पुरंदरे यांना चोपडा परिसराची माहिती देतांना थाळनेर येथे असलेल्या ऎतिहासिक घुमटाकार समाध्यांची माहिती आम्ही दिली.अन काही क्षणात स्व. बाबासाहेबांना थाळनेर आणि लतादीदींच्या स्थान नात्याबद्दलचा काही संबंध आहे याचे स्मरण झाले.त्यावेळी आम्ही म्हटले हो ते स्व.लतादीदींचे आजोळ...बस्स स्व.बाबासाहेबांनी त्या आजोळी भेट देण्याचा विशेष आग्रह धरला.
दुस-या दिवशी जाणता राजाचे आयोजक डॅा.सुरेश बोरोले यांना सांगून वाहनाची व्यवस्था केली.महानाट्याच्या प्रयोगापुर्वी परत यायचे ठरवून आम्ही मी(श्रीकांत नेवे),शिवचरित्र अभ्यासक श्री.दादा नेवे,जेष्ठ पत्रकार रमेश पाटील व बाबासाहेबांचे स्विय सहाय्यक प्रतापराव आम्ही सकाळी थाळनेर ला गेलो.गावात जैन मंदिरात काही मूर्त्यांची चोरी झाल्याने गावात पोलीसांचा मोठा राबता होता.
त्यात आम्ही तपास करत लतादीदींच्या आजोळी पोहचलो.आजोळाच्या घराच काही वाद न्याय प्रविष्ट होता.त्यामुळे स्व.लतादीदींचे नात्याचे भाऊ वयस्कर गृहस्थ त्यांना गावातील वातावरणाचे काही वेगळेच वाटले.ते बाबासाहेब व आम्हाला घराचा दरवाजा उघडून आतही घ्यायला तयार नव्हते.दादा नेवे व आम्ही त्यांना समजावून सांगितले. बाबासाहेबांचा त्यांना परिचय करुन दिला.फार विणवण्यांनंतर त्या वयस्कर गृहस्थांना लक्षात आले की न्यायिक विवादाचा यांचा संबध नाही.
त्यावेळी त्यांनी स्व बाबासाहेब व आम्हांला घरात प्रवेश दिला.बाबासाहेब स्व.लतादीदींचे अत्यंत साध्या जुन्या लाकडी घराचे आजोळ बघून खूष झाले.बराचवेळ स्व.बाबासाहेब व दीदींचे बंधू कुटुंबाची सर्व माहिती चर्चा करत होते.
शिवसृष्टीसाठी घेतले जाते
स्व.बाबासाहेब घराची पाहणी करत असतांना स्व. लतादीदींच्या आजींनी ज्या जात्यावर धान्य दळले होते.ते घरामागील विशाल वटवृक्षाजवळ पडून असलेले जाते नजरेस पडले.त्यावेळी स्व.बाबासाहेबांनी त्या वयस्कर गृहस्थांना विचारले की,हे जाते मी शिवसृष्टी साकारतो आहे.त्यासाठी नेले तर चालेल का? तेवढीच शिवसृष्टीत लतादीदींच्या आजोळाची आठवण जपली जाईल.त्यांचा होकार मिळाल्यानंतर आम्ही ते अवाढव्य जाते गाडीत टाकले.
त्यानंतर स्व.बाबासाहेबांनी थाळनेरच्या गावानजिक असलेल्या गोल घुमटाकार समाध्यांची पाहणी केली.त्याचा ऎतिहासिक वारसा विषद केला.स्व.बाबासाहेब पुरंदरेंची लतादीदींच्या आजोळी भेट देण्याची उत्सुकता मात्र भावनाविवश करणारी होती.