सार्वजनिक शिवजन्मोत्सवासाठी कार्यकर्त्यांची बैठक

 



सार्वजनिक शिवजन्मोत्सवासाठी कार्यकर्त्यांची बैठक

चोपडा दि.०२(प्रतिनिधी)- शहरात शासकीय तारखेनुसार येणाऱ्या दि.१९ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या शिव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी शेतकी संघाच्या सभागृहात शिवप्रेमी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

यावेळी शहरातून शिवजयंती उत्सव दिमाखदारपणे साजरा करण्यासाठी या बैठकित सांगोपाग चर्चा करण्यात आली.शहराची यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर सजावट केली जाणार आहे. नियोजन करण्यासाठी विविध समित्या निर्माण केल्या जाणार आहेत.

यावेळी अमृतराज सचदेव, यशवंत चौधरी, अनिल वानखेडे,राजेंद्र पाटील (बिटवा),भटू पाटील, दिनेश बाविस्कर, शाम परदेशी, डॅा.रोहन पाटील, पंकज पाटील, गजेंद्र जैस्वाल,प्रकाश पाटील, श्रीकांत नेवे,योगेश चौधरी,धर्मदास पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने