*चोपडा नगर पालिकेच्या बायोगॅस वीज निर्मिती प्रकल्प अंतिम टप्प्यात..८०० पोलवर ३६ वॅटचे बल्ब लखलखणार.. महिन्याला २ लाखाचे वीज बील वाचणार.. प्रकल्प संचालिका क्षितीजा पाटील ह्यांची माहिती*
चोपडा दि.२९ (प्रतिनिधी): नगर पालिकेने शहरांच्या विकासात अजून एक मानाचा तुरा रोवण्यासाठी कंबर कसली असून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात सोबतच बायोगॅस वीज निर्मिती प्रकल्पाची भर घालत स्व:बळावर शहर लखलखीत प्रकाशाने चमकविण्याचा प्रयत्न अंतिम टोकाला आला आहे. येत्या महिन्याभरात हा प्रकल्प पूर्ण होऊन शहरातील आठशे पोलवर ३६ वॅटचे बल्ब लखलखणार आहेत.त्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नातील २ लाखाचे वीज बील महिन्याला वाचणार आहे.फार मोठी रक्कम वाचणार असल्याने न.पा. चा फायदा होणार आहे म्हणजे च् शहरवासीयांचा लाभ होणार आहे अशी माहिती प्रकल्प प्रमुख पुणे डेक्कन एन्टप्रायजेसच्या संचालिका क्षितीजा पाटील ह्यांनी झटपट पोलखोल न्यूज शी बोलतांना दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, हा बायोगॅस वीज प्रकल्प उभारणीसाठी १ कोटी २० लाखांच्या घरात रक्कम लागतं असून प्रकल्पाचे काम जवळपास ८०% पूर्ण झाले आहे.अवघ्या महिन्याभरात हा प्रकल्प पूर्ण होऊन शहर वासियांना आठशे पोलवर ३६वॅटचे बल्ब लखलखतील असा अंदाज आहे. पाच टन ओल्या कचऱ्यापासून ५०० किलो वॅट अर्थात अर्धा मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे मिथेन गॅस बलून ८०मीटर क्यूब द्वारे स्क्रबर करून गॅस जनरेटरला जोडून गॅसटॅंकमध्ये साठवणूक सिस्टम आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षांचे अॕग्रुमेंटने डेक्कन एन्टप्रायजेस चालविण्यासाठी ताब्यात घेईल असेहि त्यांनी यावेळी स्पष्ट केले.