*मस्जिद नज़ीर अहलेसुन्नत पाचोरा यांच्या लिखित विनंतीवर मा. आमदार साहेबांनी हज कमिटी चा निर्णय मागे घेण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांना केला आग्रह *





 *मस्जिद नज़ीर अहलेसुन्नत पाचोरा यांच्या लिखित विनंतीवर मा. आमदार साहेबांनी हज कमिटी चा निर्णय मागे घेण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांना केला आग्रह *

       पाचोरा दि.२९(प्रतिनिधी). मस्जिद ए नजीर अहले सुन्नत पाचोरा तर्फे हज हाऊस मध्ये UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यां विरोधी निर्णय मागे घेण्याच्य आग्रहवर  माननीय आमदार किशोरअप्पा पाटील पाचोरा-भड़गाव मतदार संघ, यांनी  अल्पसंख्यांक केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना पत्र लिहून निर्णय मागे घेण्याचा आग्रह केलेला आहे. मस्जिद ए नजीर चे शिष्टमंडळाने आज माननीय आमदार साहेब यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हज कमिटीचा मुद्दा मांडला. यावेळी मस्जिदे नज़ीर अहलेसुन्नत  चे मौलवी अब्दुल कादिर , मस्जिदचे चेअरमन नासीर खान ,इतर सदस्य शेख जावेद रहीम, निसार पिंजारी,अज़हर खान मोतीवाला हे उपस्थित होते.

           मुंबई येथे हज कमिटी ऑफ इंडिया द्वारे चालवली जाणारी UPSC निवासी प्रशिक्षण संस्था ही देशभरात नावाजलेली संस्था आहे .या संस्थेतील अनेक विद्यार्थी आईएएस, आयपीएस, आई आर एस बनून देश सेवा करत आहे.

      2017 च्या अगोदर इथे फक्त 50 विद्यार्थींसाठी भोजन, राहणे व अभ्यासाची सोय होती,पण 2017 मध्ये आलेले नवीन सीईओ डॉ. मकसूद खान साहेब यांनी आपल्या मेहनत व परिश्रमाने शिक्षणापासून  दूर असलेल्या अल्पसंख्यांक समाजाचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या लाभ घेऊन स्पर्धा परीक्षा मध्ये यशस्व व्हावे या हेतूने विद्यार्थी संख्या 100 वरून वाढवून 200 केलेली होती. याचा परिणाम असा झाला की दरवर्षी या संस्थेतून विद्यार्थी upsc मध्ये उत्तीर्ण होत आहे. उदाहरणार्थ यावर्षी धुलिया शहराचे आसीम खान किफायत  खान  या विद्यार्थी ने यूपीएससी मध्ये 536 रँक प्राप्त केलेला आहे.

         परंतु 2021 मध्ये आलेले नवीन सीईओ याकुब शेख यांनी आपली अन्यायकारक धोरणे  आणि फर्मान काढून 200 ची संख्या कमी करून 100  केली. सीनियर स्टुडंट्स ला हज हाऊस सोडण्यासाठी विवश केले. सर्व हद्दपार करून या वर्षी मुख्य परीक्षा लिहिणारे विद्यार्थ्यांना सुद्धा हाऊस सोडण्याच्या आदेश दिला. या विद्यार्थ्याकडे मुलाखत ची तयारी करण्यासाठी फक्त 40 ते 45 दिवस राहिलेले आहे. अशा प्रमाणे विद्यार्थी यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 

        हज कमिटी ऑफ इंडिया मुंबई हे गरीब मुस्लीम विद्यार्थींसाठी महाराष्ट्र मध्ये एकमेव स्थान आहे .धार्मिक स्थळ असल्याने महाराष्ट्राचे पालक आपल्या मुलींना निश्चिंत पणे संस्थेत स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी पाठवतात. या वर्षी चार मुली सुद्धा यूपीएससीची पूर्व परीक्षा यशस्वी झाल्या आहेत. या मुलींचे चांगले रिझल्ट येण्यास सुरुवात झाली होती. पण नवीन आलेले सीईओ साहेबांचे अन्यायकारक निर्णयामुळे ह्या मुलींच्या भविष्य अंधारात जात आहे.

           पाचोरा- भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडून केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मा. मुख्तार अब्बास नकवी यांना  पत्र लिहून हे अन्यायकारक निर्णय मागे  घेण्यासाठी आग्रह करण्यात आलेला आहे. पत्राद्वारे मागणी केलेली आहे की हज कमिटी मध्ये विद्यार्थी संख्या 200 हुन वाढवून 400 करण्यात यावी. एकूण 400 जागा मधून 50 टक्के जागा,म्हणजे 200 जागा मुलीसाठी राखीव ठेवाव्यात.400 मधून  50% जागा म्हणजे 200 जागा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात. गरीब विद्यार्थ्यांसाठी SC - ST प्रमाणे 5000 रुपये मासिक भत्ता देण्यात यावा.

        याची प्रत  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक साहेब, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना पाठवण्यात आलेली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने