आदिवासींनी व मतदार संघातील जनतेने पाहिलेले विकासाचे स्वप्नं पूर्ण करणे हेच माझे ध्येय.. आ.सौ.लताताई सोनवणे.
................................................................................
कठोरा येथे विकास कामांचा फुटला नारळ..माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांनी विकास कामांचा केलेला संकल्प म्हणजे आर्य चाणक्य प्रतिज्ञाच..!
चोपडा दि.२९ ( प्रतिनिधी संजीव शिरसाठ) मा सौ लताताई सोनवणे आमदार चोपडा विधानसभा मतदारसंघ यांच्या निधितुन कठोरा ता चोपडा या गावी १० लक्ष कामांचे उद्घाटन मा सौ लताताई सोनवणे आमदार,मा श्री प्रा अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे मा आमदार,मा श्री दादासाहेब शामकांत सोनवणे उपाध्यक्ष जिल्हा बँक, यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी राजेंद्र पाटील ता प्रमुख शिवसेना,पी आर माळी सर पत्रकार,मा श्री नामदेवराव पाटील मा सरपंच वडगाव बु व कठोरे गावातिल नागरीक शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आपला चोपडा विधानसभा मतदारसंघाचा विकासासाठी कटिबद्ध असलेले आमदार मा सौ लताताई सोनवणे,व कार्यसम्राट प्रा अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे मा आमदार हे कुठलाही द्वेष भाव न ठेवता फक्त माझा मतदारसंघातील विकासकामे हेच ध्येय उराशी बाळगून विकासकामे करत आहेत.