*विरवाड्याच्या युवकास दारुच्या नशेत जिवंत ठार मारण्याची धमकी..माजी पं .स. सभापती पूत्रावर पोलिसांत गुन्हा*.. *दोन दिवस आधीच्या शाब्दिक चकमकीचे पडसाद.. परस्परविरोधी तक्रार पोलिस चौकीच्या पायरी पर्यंत*

 



*
विरवाड्याच्या युवकास दारुच्या नशेत जिवंत ठार मारण्याची धमकी..माजी पं .स. सभापती पूत्रावर पोलिसांत गुन्हा*.. *दोन दिवस आधीच्या शाब्दिक चकमकीचे पडसाद.. परस्परविरोधी तक्रार  पोलिस चौकीच्या पायरी पर्यंत*

चोपडा दि.२८ ( प्रतिनिधी)चोपडा तालुक्यातील विरवाडा येथील विद्यमान सरपंच विशाल आत्माराम म्हाळके यांनी दारूच्या नशेत एकास धक्का बुक्की करत जिवंत ठार मारण्याची धमकी दिल्याने गावभर प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ते पं.स.चे माजी सभापती आत्माराम म्हाळके यांचे चिरंजीव असल्याने  गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे गोरगरीब जनतेचे म्हणणे असून गावात भितीयुक्त वातावरण निर्माण झाले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,दि.२७ जानेवारी रोजी ६:३० वाजेच्या सुमारास विशालआत्माराम म्हाळके  यांनी दारूच्या नशेत सागर देविदास कोळी ( वय२२) यांस काही एक कारण नसतांना धक्का बुक्की करत तुला जिवंत ठार मारू अशी धमकी दिली.अशी तक्रार सागर कोळी यांनी दिल्या वरून पोलिसांत प.ना.का.रजि.नं४९/२०२२भादविं कलम ५०४,५०६,५१०गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दरम्यान याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे.अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने