एबीव्हीपी च्या माध्यमातून तालुकास्तरीय ऑनलाइन वकृत्व स्पर्धे संपन्न*


 



*एबीव्हीपी च्या माध्यमातून   तालुकास्तरीय ऑनलाइन वकृत्व स्पर्धे संपन्न* 

शिंदखेडा दि.१६(प्रतिनिधी)युगपुरुष श्री स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त शिंदखेडा येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने तालुकास्तरीय ऑनलाईन वकृत्वस्पर्धा चे आयोजन करण्यात आले होत या स्पर्धेत इयत्ता आठवी ते पदवीपर्यंतच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ शिंदखेडा येथील श्री एन डी मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे संपन्न झाला

  कार्यक्रम प्रसंगी शहरातील उद्योजग दिनेश सूर्यवंशी शहराध्यक्ष  प्राध्यापक श्री उमेश चौधरी तसेच प्रा श्री अतुल  पाटील शहरमंत्री यश मराठे आदी मान्यवर उपस्थित होते 

    स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद आणि आजचा युवक या विषयावर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन वकृत्व सादर केल होते  व वकृत्वा चा व्हिडिओ बनवून ऑनलाइन सहभाग नोंदवला होता  यात तालुक्यातून एकूण पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता

 यासर्व  विद्यार्थ्यांच्या व्हिडिओची निरीक्षण करून परीक्षकांच्या माध्यमातून तालुक्यातून प्रथम क्रमांक कु लीलेश्वरी साहेबराव माळी एस एस व्ही पी एस महाविद्यालय शिंदखेडा , द्वितीय क्रमांक कु  कृपा नयनकुमार देसले जनता हायस्कूल शिंदखेडा तृतीय क्रमांक वैष्णवी गोपाल सिंग गिरासे एन डी मराठे हायस्कूल शिंदखेडा तर उत्तेजनार्थ कु उर्मिला दरबार सिंग गिरासे यांनी पटकावला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु गुंजन जाधव यांनी तर मान्यवरांचे आभार यश मराठे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संकेत मराठे अभिषेक बालमुकुंद सत्तळीस यश खैरनार दिव्यांनी जाधव महेश गिरासे पवन माळी जयेश माळी स्वप्निल परदेशी निलेश गिरासे  यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने