चुंचाळे गावातील एका विवाहीत आदीवासी तरूणाची संतापाच्या भरात आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या












 चुंचाळे गावातील एका विवाहीत आदीवासी तरूणाची संतापाच्या भरात आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या

मनवेल ता.यावलदि.१७ ( प्रतिनिधी गोकुळ कोळी) तालुक्यातील चुंचाळे गावातील राहणाऱ्या एका तरूणाची गळफास घेवुन आत्मह्त्या पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की असलम सायबु तडवी वय३० वर्ष राहणार चुंचाळे तालुका यावल धंदा मोलमजुरी याने आज दिनांक १४ जानेवारी रोजी सकाळी १०ते १० , ३oवाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात संतापाच्या भरात घरातील छ्ताला साडी बांधुन  गळफास घेवुन आत्महत्या केल्याची माहीती मिळाली असुन असलम तडवी असे त्या  आत्महत्या तरूणाऱ्या तरूणाचे नांव आहे .आत्महत्या केलेल्या असलम सायबु तडवी याचे कुंटुब हे थंडीचे दिवस असल्याने घराबाहेर बसले असता तडवी यांचा सहा वर्षाचा आशु नांवाचा मुलगा हा घरात आपल्या वडीलांना पाहण्यासाठी गेला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला , आत्महत्या करणाऱ्या तरूणाच्या कुटुंबाने तात्काळ तडवी यांना फास्यावरून खाली उतरवले व तो जिवंत असल्याचे कळताच ताच्या नातेवाईकांनी उपचारासाठी जळगाव येथे घेवुन जात असतांना वाहन जळगाव शहरात पहोचताच त्या तरूणास मृत्युने गाठले व त्याची प्राणज्योत मावळली , मयत तरूण असलम तडवी हा मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह करीत होता . त्यास दारूचे व्यसन असल्याचे वृत्त आहे . मयत तडवी याच्या मृतदेहावर जळगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने