थोरगव्हाण ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी ज्योति पाटील

 





थोरगव्हाण ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी ज्योति पाटील


मनवेल ता.यावल दि.१६(प्रतिनिधी गोकुळ कोळी): येथून जवळच  असलेल्या थोरगव्हाण येथील ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी ज्योति केवल पाटील यांची निवड करण्यात आली.

थोरगव्हाण ग्रामपंचायत लोकनियूक्त सरपंच उमेश सोनवणे  यांना जिल्हाधिकारी जळगाव यांनी जातीच्या दाखला वैद्यता  वेळेत सादर केला नसल्यामुळे अपात्र केल्याने रीक्त जागी उपसरपंच ज्योति केवळ पाटील यांची प्रभारी सरपंचपदी निवड मासिक सभेत करण्यात आली.

ग्रामपंचायतची मासिक सभा उपसरपंच ज्योति पाटील याचा अध्यक्षतेखाली घेण्यात आली ग्रामपंचायतचे ग्रामसेविका सौ.कविता बावीस्कर यांनी सभेला सुरुवात करुन अजेंडा वरील विषय वाचन करुन सविस्तर माहीती दिली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्यं गोपाल चौधरी ,हिरालाल चौधरी, अनिल भालेराव, पदमाबाई पाटील, मनोहर पाटील, सिध्दुबाई पाटील, यशोदाबाई भालेराव, मथुराबाई पाटील उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने