*कोव्हिड कलाकार अर्थसहाय्य समिती कडून अधिकाऱ्यांचा सत्कार !*

 




*कोव्हिड कलाकार अर्थसहाय्य समिती कडून अधिकाऱ्यांचा सत्कार !*                   

वाशीमदि.१८(प्रतिनिधी) : स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात, आज दि.१७ जाने रोजी, मा . उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी, कोरोना संकटात उपासमारीने त्रस्त झालेल्या लोककलाकरीता .जाहिर केलेल्या, अर्थसहाय्य पॅकेजच्या अंमल बजावणी तथा मंजूरी करीता, तातडीची सभा घेण्यात आली . यावेळी नव्याने गठीत झालेल्या, कोव्हिड कलाकार अर्थसहाय्य समितीचे अशासकिय सदस्य, वसंता महाराज राठोड, हभप . श्रीकृष्ण महाराज राऊत, सप्तखंजेरीवादक पंकजपाल महाराज राठोड, अ .भा . मराठी नाट्य परिषदेचे मुख्य कार्यवाह श्रीकांत भाके, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी लोककलावंत संजय कडोळे, प्रवचनकार हभप . राजाराम पाटील राऊत, उत्तम उर्फ धम्मानंद इंगोले, शाहिर संतोष खडसे, शाहिर रतन हाडे यांनी मा सुनिल निकम अति . मुख्य कार्यकारी अधिकारी जि .प . वाशिम, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एम जे वाठ, समाजकल्याण निरिक्षक अविनाश नवघरे, निरक्षक देवानंद लकडे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले असे महाराष्ट्र साप्ता.ग्रामिण पत्रकार परिषदचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकात कळवीले आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने